
Lalbaugh Crime News : मुंबईच्या लालबाग परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्याच ५५ वर्षीय आईची हत्या करून मृतदेहाचे इलेक्ट्रिक मार्बल कटर आणि कोयत्याच्या मदतीने तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे हत्येच्या तब्बल दोन ते तीन महिन्यांनंतर पोलिसांनी घरातूनच महिलेच्या शरीराचे तुकडे जप्त केले आहेत.
याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी रिंपल जैन नावाच्या चोवीस वर्षीय महिलेला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत वीणा जैन यांच्या शेजाऱ्यांनी त्यांचा भाऊ सुरेशकुमार पोरवाल यांना त्यांची बहीण गेल्या कित्येक दिवसांपासून बेपत्ता असल्याचं सांगितलं.
मंगळवारी पोरवाल यांची मुलगी वीणा जैन यांना महिन्याच्या खर्चाचे पैसे देण्यासाठी इब्राहीम कासम चाळ येथील घरी आली. मात्र रिंपलने तिला घरी घेतले नाही त्यानंतर सुरेशकुमार पोरवाल आले असता त्यांना देखील घरी न घेतल्याने त्याला संशय आला.
अखेर दरवाजा तोडून त्यांनी घरात प्रवेश केला असता वीणा सापडली नाही पण घरातून दुर्गंधी येत होती त्यातून त्यांचा संशय आणखीन बळावला. त्यांनी थेट काळाचौकी पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता सुरुवातीला हरवल्याची तक्रार नोंदवली आणि घरी जाऊन पाहणी केली असता घरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्लास्टिकच्या गोणीत गुंडाळलेले मृतदेहाचे तुकडे आढळले.
वीणा यांच्या शरीरापासून त्यांचे हात पाय वेगळे करण्यात आले होते. धड हे प्लास्टिकच्या गोणित गुंडाळून कपाटात ठेवण्यात आले होते. तर हात पाय हे स्टीलच्या टाकीतून जप्त करण्यात आले. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार किरकोळ वादातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
हत्येनंतर मुलीने इलेक्ट्रिक मार्बल कटर, कोयता आणि सुरीच्या सहाय्याने मृतदेहाचे तुकडे केल्याचे समोर आले आहे. पोलिसांना घरातून शरीराच्या तुकड्यांसह इलेक्ट्रिक मार्बल कटर, कोयता आणि सुरी देखील जप्त केली आहे. आई आणि तिच्या मुलीमध्ये नेमक्या कोणत्या कारणावरून वाद होता याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच या हत्येत अजून कोणी सहभागी आहे का याचा तपास सध्या काळाचौकी पोलीस करत आहेत.
शहर
- सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार! कच्च्या तेलाच्या दरात ७ टक्क्यांची प्रचंड उसळी; महाराष्ट्र व देशभरात पेट्रोल-डिझेल आणि CNG चे नवे दर जाहीर!
- मान्सूनची पाऊले वेगवान! गोवा, कर्नाटक, केरळ किनारपट्टीवर ढगांची दाटी; मुंबईसह उपनगरांत पावसाची दमदार हजेरी!
- पुणे नसरापूर चिमुकली हत्या प्रकरण: तीन लहान मुलांची न्यायालयात महत्त्वाची साक्ष; आरोपीच्या कृत्याचा केला पर्दाफाश
- धक्कादायक! स्वतःला 'RAW' अधिकारी सांगून तरुणीशी थाटला संसार; लग्नानंतर सत्य समोर येताच पायाखालची जमीन सरकली!
महाराष्ट्र
- सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार! कच्च्या तेलाच्या दरात ७ टक्क्यांची प्रचंड उसळी; महाराष्ट्र व देशभरात पेट्रोल-डिझेल आणि CNG चे नवे दर जाहीर!
- मान्सूनची पाऊले वेगवान! गोवा, कर्नाटक, केरळ किनारपट्टीवर ढगांची दाटी; मुंबईसह उपनगरांत पावसाची दमदार हजेरी!
- पालघर: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा 'ब्रेकथ्रू'तिसऱ्या डोंगराळ बोगद्याचे काम पूर्ण; कामाला वेग!
- पुणे नसरापूर चिमुकली हत्या प्रकरण: तीन लहान मुलांची न्यायालयात महत्त्वाची साक्ष; आरोपीच्या कृत्याचा केला पर्दाफाश
गुन्हा
- धक्कादायक! स्वतःला 'RAW' अधिकारी सांगून तरुणीशी थाटला संसार; लग्नानंतर सत्य समोर येताच पायाखालची जमीन सरकली!
- बीडमध्ये वाल्मिक कराड गँगची दहशत कायम! जुगार अड्ड्याला विरोध केल्याने महिलेला अमानुष मारहाण; मुलांनाही उचलून फेकले. create landscape image no text on image no colllage image
- नवी मुंबईत अमानवीय घटना! आई-वडिलांना मारहाण करून घराबाहेर काढणाऱ्या मुलावर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका.
- अहिल्यानगरात गुन्हेगारी टोळीचा थरार! कॉन्ट्रॅक्ट नाकारल्याचा राग, कंपनीच्या एचआर हेडवर मारहाण करत लुटमार.
राजकीय
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
- "महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: महायुतीची उमेदवारांची यादी निश्चित; शिंदे आणि अजित पवार गटाकडून नावांची घोषणा!"
इतर
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
मनोरंजन
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
देश विदेश
- डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबतचा मोठा बदल; भारताला याचा फायदा होणार की फटका?
- लग्नाच्या काही तासांतच काळाचा घाला! भारतीय वंशाच्या पायलटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; नववधू ६ तास ढिगाऱ्याखाली अडकून
- इराकजवळ मालवाहू जहाजावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला, इराणने स्वीकारली जबाबदारी; आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ
- अमेरिका-इराण पुन्हा आमने-सामने! अमेरिकेचे इराणच्या लष्करी तळांवर पुन्हा बॉम्बहल्ले; गेरुक शहर व केशम बेट ठरले लक्ष्य
























Subscribe to my channel




