
तिरूवअनंतपुरम : लग्न झाल्यानंतर घरातील कुटुंबात नवीन पाहुणा आला की, सर्वांचेच आनंदाश्रू तरळतात. मग ते गोंडस बाळ मुलगा असो वा मुलगी घरातील मंडळींच्या आनंदाला पारावरच राहत नाही. पण आता केरळमध्ये राहणाऱ्या एका तृतीयपंथीयाच्या घरीही पाळणा हलणार आहे. कोझीकोडे येथे राहणाऱ्या तृतीयपंथीय कपलने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. ट्रान्स मॅन साहद आणि ट्रान्स वुमन झिया पावल हे तृतीयपंथीय कपल तीन वर्षांपासून एकमेकांसोबत राहतात. मार्च महिन्यात बाळाला जन्म देणार असल्याची शक्यता झियाने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे वर्तवली आहे. तृतीयपंथीयांच्या अशी प्रेमकहाणी देशातील पहिलंच प्रकरण असल्याचं बोललं जात आहे.
कोझीकोडे येथे क्लासिकल डान्स टिचर असलेल्या झियाने त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल बोलताना म्हटलं की, आम्ही तीन वर्षांपासून एकत्र राहतो. इतर तृतीयपंथीयांपेक्षा आमचं जीवन वेगळं असावं, असं आम्हाला वाटतं. तृतीयपंथीयांना काही ठिकाणी बंदी घालण्यात आलीय. काही कुटुंबात तृतीयपंथीयांना मानसिक त्रासालाही सामोरं जावं लागतं. जगात आमचं अस्तित्व कायम राहावं, यासाठी आम्ही एका बाळाला जन्म द्यायचं ठरवलं. खूप विचारविनिमय झाल्यानंतरच आम्ही हा निर्णय घेतला.
साहद (२३) आणि झिया (२१) हे तृतीयपंथीय कपल तीन वर्षांपासून एकत्र राहतात. लिंग परिवर्तनासाठी या दोघांनीही हार्मोन थेरेपी केली आहे. यासाठी साहदची स्तनही काढण्यात आले. बाळाला जन्म दिल्यानंतर पुन्हा अशाच प्रकारेच साहदचा जीवनप्रवास सुरु राहील. ट्रान्स मॅन आणि ट्रान्स वुमन अशाच प्रकारचं जीवन आम्ही पुढील आयुष्यात जगणार आहोत. मी माझी हार्मोन ट्रिटमेंट सुरु ठेवत आहे. प्रसृतीनंतर सहा महिन्यांनी किंवा एका वर्षानंतर सहाद ट्रान्स मॅन होण्यासाठीची ट्रिटमेंट पुन्हा सुरु करेल, असंही झियाने म्हटलं आहे. कोझीकोडे येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी आम्हाला मदत केली. पुढील महिन्याद साहदची प्रसुती याच रुग्णालयात करण्यात येणार आहे. साहदने स्तन काढल्यामुळं आम्ही बाळाला रुग्णालयातील ब्रेस्ट मिल्क बॅंकेतून दुधाची उपलब्धता करुन देऊ, असंही झियाने पोस्टच्या माध्यमातून सांगितलं.
शहर
- "भारताच्या अण्वस्त्र धोरणात ऐतिहासिक बदल; एकूण अण्वस्त्रांची संख्या १९० वर, शेजाऱ्यांना धडकी!"
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
महाराष्ट्र
- जळगाव: काळाचा क्रूर खेळ! कार-एसटी आणि दुचाकीच्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू; दोन आनंदी संसार उध्वस्त.
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
गुन्हा
- गडचिरोली: माणुसकीला काळीमा! नवीन घराच्या गच्चीवर ७ वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग; नराधम पेंटरला बेड्या
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला


























Subscribe to my channel

