Tragedy in Satara: Newly Married Couple Killed in Horrific Road Accident Just 10 Days After Wedding

सातारा: लग्नानंतर अवघ्या १० दिवसांत नवदाम्पत्यावर काळाचा घाला; भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

Tragedy in Satara: Newly Married Couple Killed in Horrific Road Accident Just 10 Days After Weddingसातारा: विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर पाटण तालुक्यातील येरफळे येथे एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. एका भीषण रस्ते अपघातात नवविवाहित पती-पत्नीचा मृत्यू झाला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या १० दिवसांपूर्वीच या दोघांचा विवाह झाला होता.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पाटण तालुक्यातील सडादाढोली येथील रहिवासी असलेले राजू झोरे (वय २५) आणि राणी झोरे (वय २३) यांचा विवाह १० दिवसांपूर्वीच मोठ्या उत्साहात पार पडला होता. सोमवारी हे नवदाम्पत्य आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे दुचाकीवरून निघाले होते.

येरफळे गावच्या हद्दीत एका ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना, समोरून येणाऱ्या एका भरधाव पिकअप गाडीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, राजू झोरे यांचा जागीच मृत्यू झाला. पत्नी राणी गंभीर जखमी झाल्या होत्या, मात्र उपचारासाठी कराडला नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.

गावावर शोककळा
ज्या घरात काही दिवसांपूर्वी लग्नाईची गडबड आणि आनंदाचे वातावरण होते, तिथेच आता या दोघांच्या मृत्यूमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हातावरची मेहंदी आणि अंगाची हळद उतरण्यापूर्वीच या जोडप्याला काळाने हिरावून नेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. पाटण पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

1 thought on “सातारा: लग्नानंतर अवघ्या १० दिवसांत नवदाम्पत्यावर काळाचा घाला; भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

Leave a Reply to Carey2110 Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *