भारत आणि अमेरिकेत झालेल्या ट्रेड डीलवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दीक द्वंद सुरु आहे. यावरुन पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी लोकसभेत विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस नेते राहुल गांधी विचारपूर्वक, बनावटी आणि खोटी कहाणी रचून शेतकऱ्यांची दिशाभूल करतायत असा आरोप पीयूष गोयल यांनी केला. शेतकरी सुरक्षित असेल, तर देशाचा विकास होईल असं सुद्धा गोयल म्हणाले. “राहुल गांधी हे काही काँग्रेस कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बसले आहेत, जे स्वत:ला शेतकरी नेते भासवतात. ते पूर्णपणे आधारहीन आणि चुकीचं बोलत आहेत. तुम्ही त्यांना मायक्रोफोन घेऊन फिरताना, चर्चा रेकॉर्ड करताना पाहू शकता. याची स्क्रिप्ट आधीपासूनच तयार असावी. कारण त्यांनी जे काही दावे केलेत ते खोटे आहेत” असा आरोप केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केला.
“भारत-अमेरिका ट्रेड डीलमध्ये मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिलं. शेतकऱ्यांचं हित पूर्णपणे सुरक्षित ठेवण्यात आलय” असं ठामपणे पीयूष गोयल यांनी सांगितलं. “या ट्रेड डीलमुळे शेतकरी, मच्छीमार, मेहनती युवावर्ग, MSMEs, स्टार्टअप्स, कारागिर यांना मदत होणार आहे. सोयाबीन आणि मक्यावर कुठलीही सवलत दिलेली नाही. राहुल गांधी हे खोटं बोलून शेतकऱ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करतायत” असं पीयूष गोयल म्हणाले.
सफरचंद, अक्रोड आयातीवर काय म्हणाले?
गावच्या लोकांमध्ये विनाकारण भिती निर्माण करण्यासाठी तथ्यहीन आरोप होत असल्याबद्दल विरोधा पक्षावर टीका केली. सफरचंद आयातीच्या निर्णयावरुन सुरु असलेल्या वादावर पीयूष गोयल बोलले की, “भारत आधीपासूनच दरवर्षी 5.50 लाख टन सफरचंदांची आयात करत आला आहे. कारण देशांतर्गत उत्पादनातून 80 टक्के मागणी पूर्ण होते. आम्ही सफरचंदांच्या अमर्यादा आयातीला परवानगी दिलेली नाही. आम्ही फक्त एक कोटा दिलाय, जो सध्याच्या आयातीपेक्षा पण कमी आहे. त्यावर सुद्धा 25 रुपयाची ड्युटी लागेल”
“अक्रोड आयतीच्या बाबतीत सुद्धा असच आहे. भारत वर्षाला 60 हजार मेट्रिक टन अक्रोड आयात करतो. त्यातला 13,000 मेट्रिक टनचा फार कमी कोटा दिलाय. अशा सौद्यामुळे स्थानिक उत्पादकांचं नुकसान होण्याची शक्यता कमी आहे” असं गोयल म्हणाले.
जुन्या रेकॉर्डवर हल्लाबोल
काँग्रेसवर निशाणा साधताना पीयूष गोयल यांनी त्यांच्या जुन्या रेकॉर्डवर हल्लाबोल केला. “काँग्रेसच्या नेतृत्वाखाली UPA राजवटीत भारताने जवळपास 20 अब्ज डॉलर्सचं शेती सामान आयात केलं होतं. यात डेअरी उत्पादनं सुद्धा होती” याची आठवण गोयल यांनी करुन दिली. US सोबतच्या ट्रेड डीलमध्ये भारताने डेअरी उत्पादनांना बाहेर ठेवलं आहे. “शेतकऱ्यांसोबत त्यांनी धोका केला, त्या बद्दल राहुल गांधी यांनी बोलावं. विरोधी पक्ष कधीपर्यंत अशा कपोलकल्पित गोष्टी पसवरणार? शेतकरी सुरक्षित तर देश विकसित होईल” असही गोयल बोलले.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


