T20 WC 2026 : कॅनडला नमवत दक्षिण अफ्रिकेने या स्पर्धेच्या इतिहासात नोंदवले इतके सारे विक्रमImage Credit source: Proteas Men Twitter
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेची सुरुवात दक्षिण अफ्रिकेने विजयाने केली. कॅनडा विरूद्धच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावला आणि प्रथम फलंदाजी करावी लागली. दक्षिण अफ्रिकेने या संधीचा पुरेपूर फायदा उचलला आहे. दक्षिण अफ्रिकेने 20 षटकात 4 गडी गमवून 213 धावा केल्या आणि विजयासाठी 214 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही कॅनडाला गाठता आलं नाही. कॅनडाचा संघ 20 षटकात 8 गमवून 156 धावांपर्यंत मजल मारू शकला. दक्षिण अफ्रिकेने हा सामना 56 धावांनी जिंकला. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेला 2 गुणांसह नेट रनरेटमध्ये जबरदस्त फायदा झाला. दक्षिण अफ्रिकेचा नेट रनरेट +2.850 आणि न्यूझीलंडचा नेट रनरेट हा +1.162 इतका आहे. या नेट रनरेटच्या जोरावर दक्षिण अफ्रिकेने न्यूझीलंडला मागे टाकत पहिलं स्थान पटकावलं आहे. या विजयासाठी दक्षिण अफ्रिकेने या सामन्यात काही विक्रम नोंदवले. काही विक्रम मोडले, काही विक्रम रचले तर काही विक्रमांच्या जवळ पोहोचले.
दक्षिण अफ्रिकेची टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 200हून अधिक धावा करण्याची ही सहावी वेळ आहे. आतापर्यंत त्यांच्या आसपास देखील कुणी नाही. भारताने तीन वेळा 200हून अधिक धावा, वेस्ट इंडिजने तीन वेळा 200हून अधिक धावा, इंग्लंडने दोन वेळा आणि श्रीलंकेने दोन वेळा 200हून अधिक धावा करण्याची कामगिरी केली आहे.
दक्षिण अफ्रिकेने टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावसंख्या केली आहे. दक्षिण अफ्रिकेनने कॅनडा विरुद्ध 213 धावा केल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर विराजमान झाले आहेत. यापूर्वी दक्षिण अफ्रिकेने इंग्लंडविरुद्ध 2016 मध्ये वानखेडे स्टेडियममध्ये 229 धावा केल्या होत्या. 2009 मध्ये स्कॉटलँडविरुद्ध 211 आणि 2016 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध 209 धावा केल्या होत्या.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेसाठी पाचव्या विकेटसाठी दुसऱ्या क्रमांकाची भागीदारी मिलर आणि स्टब्स यांच्यात झाली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद 75 धावांची भागीदारी केली. यापूर्वी दक्षिण अफ्रिकेकडून क्लासेन आणि मिलरने 2024 वर्ल्डकप स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध 79 धावांची भागीदारी केली होती.
दक्षिण अफ्रिकेने कॅनडाला पराभूत करत टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात श्रीलंकेच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. टी20 वर्ल्डक स्पर्धेतील हा दक्षिण अफ्रिकेचा 33 वा विजय आहे. श्रीलंकेच्या नावावरही 33 विजय आहे. तर भारत या यादीत पहिल्या स्थानावर असून 36 विजय मिळवले आहेत.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील दक्षिण अफ्रिकेचा हा चौथा मोठा विजय आहे. यापूर्वी स्कॉटलँडविरुद्ध 2009 मध्ये 130 धावांनी, 2022 मध्ये बांगलादेशविरुद्ध 104 धावांनी, 2010 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध 59 धावांनी आणि आता कॅनडाविरुद्ध 57 धावांनी विजय मि्ळवला आहे.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक वेळा आऊट होणारा विकेटकीपर बॅट्समन म्हणून क्विंटन डिकॉकने महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. दोघंही टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 32 वेळा आऊट झाले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान कामरान अकमल असून 30 वेळा बाद झाला आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


