Swine Flu in Maharashtra : स्वाईन फ्लूचा महाराष्ट्रात शिरकाव, मालेगावमध्ये दोघांचा मृत्यू; नागरिकांमध्ये घबराट

Swine Flu in Maharashtra : नाशिकच्या मालेगाव शहरात स्वाईन फ्लूचा पुन्हा एकदा शिरकाव झाला आहे. स्वाईन फ्लूची लागण होऊन दोघांचा मृत्यू झालाय. सदर घटनेमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तसेच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, स्वाईन फ्लूने माजी कृषी अधिकारी व एका महिलेचा मृत्यू झालाय. यामुळे मालेगाव महापालिका प्रशासनाचे आरोग्य विभाग पुन्हा एकदा अर्लट मोडवर आले आहे. मृत्यू झालेल्या कुटूंबातील व्यक्तींचा तसेच परिसरातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे.

Buldhana Bus Accident : बुलढाण्यात भीषण अपघात! खासगी बस १०० फूट दरीत कोसळली; २८ जखमी

कोणालाही सर्दी,ताप,खोकल्याची लक्षणे आढळल्यास त्यांनी तातडीने महापालिकेच्या आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घ्यावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री आहेर यांनी केले आहे. साधी लक्षणे असल्याने आपल्याला स्वाईन फ्लू झाला आहे की नाही हे पटकन लक्षात येत नाही. त्यामुळे साधा सर्दी, खोकला असला तरी देखील उपचार घ्यावेत, असं महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply