Sunil Kedar Corruption News : सुनील केदार यांना मोठा झटका; सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

Sunil Kedar Corruption News : नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात कॉंग्रेस नेते सुनील केदार यांना न्यायालयाने सुनावलेली ५ वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे. जिल्हा बँक रोखे घोटाळा प्रकरणात शिक्षा निलंबित करून जामीन मिळावा आणि दोषसिद्धी स्थगिती निर्णयावर आज निकाल लागला. मात्र या प्रकरणात सुनील केदार यांना कोणताही दिलासा मिळाला नसून त्यांचा जामीन आणि दोष सिद्धीला जिल्हा सत्र न्यायालयाने नकार दिला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागपूर जिल्हा सहकारी बँक रोखे घोटाळा  प्रकरणांमध्ये सुनील केदार यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी यांचा जामीन आणि दोष सिद्धीला जिल्हा सत्र न्यायाधीश पाटील यांनी नकार दिला आहे.

Political News : पिंपरी चिंडवडमध्ये अजित पवार गटाला खिंडार; माजी महापौरांसह शेकडो कार्यकर्ते ठाकरे गटात

हा गंभीर स्वरूपाचा घोटाळा असून यामध्ये जामीन देणे हे चुकीचं ठरेल असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत 53 साक्षीदार तपासण्यात आले आहेत. यासह कागदपत्र पुरावे स्वरूपात जोडण्यात आले आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. तसेच या घोटाळ्यात गरीब शेतकऱ्यांचा पैसा आहे. त्यामुळे या प्रकरणात शिक्षेला जामीन दिल्यास किंवा स्टे दिल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल, असेही न्यायालयाने म्हणले आहे.

दरम्यान, याआधी न्यायालयाने सुनील केदार यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्यांची आमदारकीही रद्द करण्यात आली होती. केदार यांना अपात्रतेची कारवाई रद्द करण्यासाठी दोषसिद्धीवर स्थगिती मिळविणे आवश्यक होते. त्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्यांना पुन्हा मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे आता सुनिल केदार यांना हायकोर्टात दाद मागावी लागणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply