Soldier Accident Ladakh : लडाखमध्ये मोठी दुर्घटना! लष्करी वाहन दरीत कोसळून 9 जवानांचा मृत्यू; महाराष्ट्राचा जवानही शहीद

Soldier Accident Ladakh : लडाखमधील लेह जिल्ह्यात लष्कराचं वाहन रस्त्यावरून घसरून खोल दरीत कोसळलं. यामुळं 9 जवान ठार झाले आणि 1 गंभीररित्या जखमी झाला. हा अपघात दक्षिण लडाखच्या न्योमा येथील कियारी परिसरात झाला असल्याची माहिती लष्कर अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.

यात महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील जवानही शहीद झाल्याची माहिती मिळत आहे. जवान वैभव भोईटे हे मूळ हिंगणगाव (ता. फलटण) येथील असून राजाळे (ता. फलटण) येथे स्थायिक असल्याची माहिती मिळत आहे. भोईटे हे या अपघातात शहीद झाले आहेत. वैभव भोईटे हे 311 आर्टिलरी रिजिमेंटमध्ये होते. त्यांच्या युनिटची पोस्टिंग लडाख इथं आहे. त्यांची पत्नी सातारा पोलीस दलात कार्यरत आहे.

लेहचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक पी. डी. नित्या यांनी सांगितले की, 10 जवानांसह लष्कराचे वाहन लेहहून न्योमाकडं जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि ते वाहन दुपारी 4.45 वाजता दरीत कोसळलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जवानांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Dahi Handi 2023 : राज्यातील गोविंदांना सरकारकडून मोठं गिफ्ट, 10 लाख रुपयांपर्यंत विमासंरक्षण; नेमकी काय मदत मिळणार?

लडाखमधील लेहजवळ झालेल्या अपघातात भारतीय लष्कराचे जवान शहीद झाल्यामुळं दु:ख झाले आहे. त्यांनी आमच्या देशासाठी केलेलं बलिदान आम्ही कधीही विसरणार नाही. माझ्या शोक संवेदना त्यांच्या शोकाकूल कुटुंबीयांसोबत आहेत, अशी भावना त्यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केली आहे.

जखमी जवानांना तातडीनं फिल्ड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर तात्काळ उपचार होऊन ते लवकर बरे व्हावेत यासाठी संरक्षण मंत्र्यांनी प्रार्थनाही केली आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या जवानावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply