Solapur News : बळीराजाची थट्टा! २४ पोती कांदा विकला; ५८ हजार खर्च अन् मिळाले फक्त ५५७ रुपये

Solapur News : केंद्र सरकारने लोकसभेच्या तोंडावर कांदा निर्यातबंदी उठवून बळीराजाला मोठे गिफ्ट दिले. तब्बल चार महिन्यांनंतर कांद्यावरील निर्यातबंदी हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. मात्र कांद्यावरील निर्यातबंदी हटली तरी शेतकऱ्यांची कुरचेष्टा मात्र सुरूच आहे. सोलापूरात एका शेतकऱ्याला एका एकरातील कांदा विकून फक्त ५५७ रुपये हाती लागलेत. या प्रकारानंतर शेतकऱ्यांनी केंद्र सरकारवर संताप व्यक्त केला आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर गावचे मारोती खांडेकर यांनी एका एकरात कांद्याचे पीक घेतले होते. एका एकरात त्यांनी २४ पाकीट कांदा लावला होता. कांदा लागवड, मशागतीला त्यांनी जवळपास ५८ हजार रुपये आला होता. कांदा काढणीला आल्यानंतर त्यांनी काल सोलापूर मार्केट समितीत विक्रीला नेला होता.

Bribe Case : शाळा प्रवेशासाठी लाच; मुख्याध्यापकासह शिक्षक ताब्यात

मात्र कांद्याला कवडीमोल भाव मिळाल्याने त्यांना या २४ पोत्यांचे फक्त २८६६ रुपये एवढी पट्टी आली. त्यातूनही हमाल, तोलाई, मोटार भाडे असा २३०९ खर्च वजा केल्यानंतर हाती फक्त ५५७ रुपये उरले. त्यामुळे बळीराजाने जगायचं कसं? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली असली तरी दर मिळत नसल्याने बळीराजाच्या पदरी निराशाच पडत आहे. कांद्याची निर्यातबंदी उठवली असली तरी निर्यातीसाठी प्रति टन ५५० डॉलर किमान निर्यात मूल्य आकारले आहे. तर 40 टक्के निर्यात शुल्क आहे. याचाच मोठा फटका शेतकऱ्याला बसताना दिसत आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply