Sita Soren : सीता सोरेन यांचा भाजपमध्ये प्रवेश

रांची : लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान काही आठवड्यांवर येऊन ठेपले असताना आज झारखंड मुक्ती मोर्चाला (झामुमो) मोठा धक्का बसला. माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची वहिनी असलेल्या सीता सोरेन यांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. सीता सोरेन यांनी दिल्लीमध्ये पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि झारखंडचे भाजप प्रभारी लक्ष्मीकांत वाजपेयी यांच्या उपस्थितीत कमळ हातामध्ये घेतले.

पक्षामध्ये आपल्याला एकाकी पाडले जात असल्याचा आरोप करत त्यांनी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांच्याकडे पदाची सूत्रे आली होती.

कल्पना यांना मुख्यमंत्री करण्यास सीता यांनी विरोध केला होता. ‘‘आपले पती दुर्गा सोरेन यांनी अनेक वर्षे झारखंडच्या चळवळीचे नेतृत्व केले होते पण त्यांच्या निधनानंतर मात्र माझ्याकडे आणि कुटुंबाकडे कोणीही लक्ष दिले नाही. आम्ही अक्षरशः वेगळे पडलो होतो. ही खरोखरच खूप वेदनादायी बाब आहे,’’ अशी भावना सीता सोरेन यांनी व्यक्त केली आहे.

Politics News : पुण्यात भाजपलाPune  मोठा धक्का, गिरीष बापट यांचे निकटवर्तीय शरद पवारांच्या गळाला

आम्हा सर्वांना एक ठेवण्यासाठी शिबू सोरेन यांनी खूप कष्ट केले पण दुर्दैवाने त्यात यश मिळाले नाही. माझ्या कुटुंबाविरोधात कारस्थान सुरू असल्याची कुणकुण मला लागली होती.

- सीता सोरेन, बंडखोर नेत्या

सीता सोरेन यांचा राजीनामा धक्कादायक बाब असून याचा त्यांनी फेरविचार करावा. घरातील वाद हे घरात मिटविले जाणे गरजेचे असते.

- महुआ माजी, ‘झामुमो’ चे नेते



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply