Simhastha Kumbh Mela Nashik : सिंहस्थ कुंभमेळा नाशिकमध्ये, ७५०० कोटींचा आराखडा; पंचवटीत रामायण काळ झर्रकन नजरसमोर येणार!

Simhastha Kumbh Mela Nashik : प्रयागराज येथे महाकुंभ मेळा फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यापुढचा कुंभमेळा हा नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होणार आहे. या कुंभमेळ्यासाठी आराखडा तयार करण्यात आलाय. २०२७मध्ये होणाऱ्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनाकडून ७५०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आलाय. यामध्ये रेल्वे स्टेशन, बस स्टॅड, एअरपोर्ट यांना शहराशी कनेक्ट केले जाणार आहे.

नमामी गोदा प्रकल्पाच्या माध्यमातून गोदा प्रदूषण मुक्तीच्याबरोबरच सुशोभीकरण देखील केले जाणार आहे. शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण, दुभाजक बसवणे, दुभाजक सुशोभीकरण करणे, रिंग रोड तयार करणे यासह शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा, आरोग्य व्यवस्था, पाण्याची व्यवस्था ,पार्किंग अशा विविध विकासकामांचा समावेश असणार आहे.

Mumbai-Pune Expressway : देशातील पहिला एक्सप्रेस वे महाराष्ट्रात, महागड्या 'एक्स्प्रेस वे वर टोल किती?

शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण, दुभाजक बसवणे, दुभाजक सुशोभीकरण करणे, रिंग रोड तयार करणे यासह शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा, आरोग्य व्यवस्था, पाण्याची व्यवस्था ,पार्किंग अशा विविध विकासकामांचा समावेश असणार आहे. दरम्यान याप्रकरणी कुंभमेळ्याचा आराखडाबाबत राज्‍याचे प्रधान सचिव मंगळवारी ३१ डिसेंबरला मंत्रालयात आढावा घेतला. नाशिकसह त्र्यंबकेश्‍वरला २०२६-२७ मध्ये सिंहस्‍थ कुंभमेळा पार पडणार आहे.

महापालिकेने विविध विकासकामांवरआधारित पंधरा हजार कोटींचा आराखडा सादर केला होता. याशिवाय भूसंपादन, रिंगरोड आदी कामांसाठी जादाचे चार हजार कोटी रुपये इतका खर्च मांडलेला होता. विभागीय आयुक्‍त डॉ. गेडाम यांच्‍याकडे नियोजनाची जबाबदारी आल्‍यानंतर त्‍यांनी आराखड्यात मोठी कपात केली होती. दरम्यान केंद्र व राज्य शासन कपात करून किमान पोट भरेल इतका निधी देईल, अशा अपेक्षेने आराखड्यातील खर्चाचे आकडे फुगवले होते. सन २०१५ मध्ये झालेल्या कुंभमेळ्यासाठी महापालिकेला जेमतेम १०५२ कोटींचा आराखडा शासनाने मंजूर केला होता.विभागीय आयुक्तांनी बैठकांचे सत्र लावत महापालिकेचा १५,००० कोटींचा आराखडा ६,९०० कोटींवर आणला होता. आता यात 600 कोटी रुपयांची कामे वाढविली गेली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply