
Shraddha News Update:श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी एक नवीन अँगल समोर आला आहे. अफताब अंमली पदार्थांचे सेवन करायचा असे श्रद्धाच्या मित्रांनी सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी या दिशेने तपासाला सुरूवात केली. अशात पोलिसांनी अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला सुरत येथून ताब्यात घेतले आहे. सध्या पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, गुजरात पोलिसांनी अंमली पदार्थ तस्कर फैजल मोमीन याला सुरतमध्ये अंमली पदार्थाच्या धक्क्यादरम्यान अटक केली. अफताबला अंमली पदार्थ पुरवणारा फैजल असावा असा पोलिसांना दाट संशय आहे. यात तपासादरम्यान समजले की, अफताब आणि फैसल या दोघांचे अनेक कॉमन मित्र आहेत. त्यामुळे अफताब आणि फैसल यांचा संपर्क झाला आहे का? याचा पोलीस शोध घेत आहेत. यासाठी पोलीस दोघांचेही कॉल डिटेल्स तपासत आहेत.
गुरूवारी दिल्लीतील रोहिणी येथे सकाळी ११.३० वाजता पॉलीग्राफ चाचणीला सुरूवात झाली. यात देखील काळीज पिळवटून टाकणारे अनेक खुलासे झाले आहेत. पॉलीग्राफ चाचणीवेळी अफताबचा रक्तदाब सर्वप्रथम तपासला गेला. त्यानंतर त्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये त्याच्या बालपनापासून श्रध्दाबरोबर असलेल्या लिव्ह इन रिलेशनशीप विषयी विचारण्यात आले. त्याच्या आवडी, सवयी आणि मित्र परिवार अशा मुद्दयांवर प्रश्न विचारण्यात आले. यात आश्चर्यकारक बाब म्हणजे उत्तरं देत असताना तो ती इंग्रजी भाषेत देत होता. मात्र त्याला सर्व प्रश्न हिंदीमध्ये विचारण्यात आले होते.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा आणि अफताब हे दोघे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. त्यामुळे हे प्रकरण बाहेर आल्यावर अनेकांना वाटले की, त्याने राग अनावर झाल्याने एवढे घृणास्पद कृत्य केले असावे. मात्र तसे नसून त्याने पूर्वनियोजन करून तिची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. श्रद्धाची हत्या करण्याआधी त्या दोघांनी एकत्र बॉलिवूडचा दृश्यम हा चित्रपट पाहिला होता.
जेव्हा त्याला श्रद्धाची हत्या रागत केली का? असे विचारण्यात आले तेव्हा त्याने सांगितले चित्रपट संपल्यावर मी माझी नविन स्टोरी रचण्याचा प्रयत्न करत होतो. क्षद्धाला मारण्यासाठी अफताबने आधीच मोठे नियोजन केले होते. हत्येनंतर देखील तो स्वत: च्या बचावासाठी पुरावे नष्ट करत होता. यासाठी त्याने श्रद्धाची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे केल्यावर तिच्या घरच्यांना आणि स्वत : च्या घरच्यांना संपर्क केला होता. फोनवर बोलताना त्याने काहीही न घडल्याचा आव आणला. तसेच हत्येसाठी वापरलेले सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नही त्याने केला.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




