Shivrajyabhishek Sohala 2023: लाल महालात शिवराज्याभिषेक, संभाजी ब्रिगेडने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवारांची उपस्थिती

Shivrajyabhishek Sohala 2023 : आज राज्यभर शिवराज्याभिषेक दिनाचा उत्साह दिसून येत आहे. रायगडवर या निमित्ताने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. तर कोल्हापुरातील देखील नवीन राजवाड्यावर शाहू महाराजांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे.

अशातच अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती आणि संभाजी ब्रिगेडकडून पुण्यातील लाल महालात आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्यास शरद पवार दाखल झाले आहेत. शरद पवार यांच्यासह आमदार रवींद्र धंगेकरही उपस्थित आहेत.

पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीपासून लाल महालपर्यंत यावेळी महिलांची पालखी मिरवणूक निघाली. राज्यातील अनेक नद्यांमधून आणलेल्या पाण्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अभिषेक शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply