ShindeVsThackeray : ठाकरे गटाला धक्का! प्रकरण ७ सदस्यीय खडपीठापुढं जाणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्णय

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टानं आज एका मुद्द्यावर निकाल दिला. यामध्ये सात सदस्यीय खडंपीठाकडं या प्रकरणाची सुनावणी व्हावी, ही ठाकरे गटाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. तसेच या खटल्यातील मेरिटनुसार यावर निर्णय घेतला जाणार आहे, त्यामुळं ठाकरे गटाची निराशा झाली आहे. त्यामुळं तुर्तास हे प्रकरण आता सात सदस्यीय खंडपीठासमोर जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. यानंतर आता पुढील सुनावणी २१ आणि २२ फेब्रुवारीला होणार आहे.

सुप्रीम कोर्टानं नेमका निकाल काय दिला?

सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठानं एक पानी निकाल वाचताना सांगितलं की, नबाम रेबिया प्रकरणाचा निकाल तपासण्यासाठी मोठ्या खंडपीठाकडं अर्थात ७ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडं हे प्रकरण पाठवायचं की नाही हे या खटल्याच्या मेरिट्सवर ठरवलं जाईल. याची पुढील सुनावणी २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता होईल.

पुढील सुनावणीत काय होणार?

पुढील सुनावणीत आता इतर मुद्द्यांवरील याचिकांवरही सुप्रीम कोर्टात नियमित सुनावणी होणार आहे. ही सुनावणी ५ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडेच होणार आहे. यामध्ये नबाम रेबिया प्रकरणाव्यतिरिक्त इतर मुद्देही घटनापीठ ऐकणार आहे. तीन दिवस झालेल्या युक्तीवादामध्ये नबाम रेबिया प्रकरणावरच प्रामुख्यानं चर्चा झाली. त्यानंतर काल आणखी काही मुद्दे समोर आले होते. त्यामुळं वेळ पुरेसा नसल्याचं सांगत खंडपीठानं याची आणखी सुनावणी होणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडं द्यायचं का यावर निकाल दिला जाईल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply