Sharad Pawar Retirement: सुप्रिया तू बोलू नकोस, अजित पवारांनी थांबवताच कार्यकर्त्यांचा आग्रह, म्हणाले, सुप्रियाताईंना बोलू द्या!

Sharad pawar News: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. लोक माझे सांगाती या आपल्या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी या निर्णयाची घोषणा केल्यानंतर सभागृहात एकच गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे बोलत असताना अजित पवार यांनी 'सुप्रिया तू बोलू नकोस, असा सल्ला दिला. 

शरद पवार  यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्तीची घोषणा केल्यानंतर अजित पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यावेळी अजित पवार म्हणाले, 'सगळ्यांच्या भावना ऐकल्या, पाहिल्या. मात्र या निर्णयाबद्दल सर्वांनी गैरसमज करुन घेतला आहे. ते अध्यक्ष नाहीत म्हणजे म्हणजे पक्षात नाही असे नाही'.

'काँग्रेस पक्षाबाबत आपण पाहत आहोत, खर्गे अध्यक्ष असतील तरी पक्ष सोनिया गांधी चालवतात," असेही अजित पवार म्हणाले. तसेच "नवीन नेतृत्वाकडे जबाबदारी देऊ पाहत आहेत, त्यांच्या डोळ्यासमोर नवीन अध्यक्ष तयार झालेला तुम्हाला मान्य नाही का," असा सुचक इशाराही त्यांनी यावेळी दिला.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *