पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंच्या सभेमुळे वातावरण चांगलंच तापलेलं आहे. मशिदीवरचे भोंगे हटवा अथवा आम्ही त्यासमोर हनुमान चालिसा लावू असा इशारा राज ठाकरेंनी आपल्या सभांमधून दिला होता. त्याचीच अंमलबजावणी व्हायला आज पहाटेपासूनच सुरूवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसही सतर्क झाले असून त्यांनी मनसैनिकांची घरपकड करण्यास सुरुवात केली आहे. याच संदर्भात पुणे पोलीस आय़ुक्तांनी आपली भूमिका मांडली आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, शहरात सकाळपासूनच दोन ते अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त आहे. परिस्थिती सामान्य असून अद्याप कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. मनसैनिकांवर केलेल्या कारवाईबद्दलही आय़ुक्तांनी भाष्य केलं असून मंदिरातली आरती कोणी थांबवू शकणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले, "ज्यांना नोटीस देण्याची गरज आहे, त्यांना नोटीस दिलेली आहे. कायदा व सुव्यवस्था नीट राहावी म्हणून ही कारवाई करण्यात आलेली आहे. सकाळची अजान लाऊडस्पीकरवर झालेली नाही. मंदिरातली आरती कोणीही थांबवू शकत नाही. पण ठरवून कोणी काही अनुचित प्रकार घडवू इच्छित असेल तर कारवाई नक्कीच केली जाईल. "
पुणे पोलिसांनी शहरात शांतता ठेवण्याचं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर पुणे पोलिसांनी ट्विटच्या माध्यमातून तरुणाईला एक प्रकारचं आवाहनही केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये पुणे पोलीस म्हणतात, "हे तरुणाई, तुझ्यासाठी..! पुण्यनगरी ही राजधानी असे सर्व शिक्षणाची संस्कृती शिकण्या येथे मांदीयाळी तरुणाईची नको आम्हा भोंगा, दंगा, पंगा अन जातीय तेढ सामाजिक सलोख्याची उभारु या मुहूर्तमेढ..! गुण्यागोविंदे नांदण्या, एकमेकां समजून घेऊ, अवघे धरू सुपंथ..!"
शहर
- इचलकरंजीकरांची तहान भागणार! जुने दानवाड येथून नवी 'राधाकृष्ण' पाणी योजना; आमदार राहुल आवाडेंनी मांडला प्लॅन, मुख्यमंत्र्यांचे आदेश
- पुणेकरांच्या चिंतेत वाढ! धरणांतील खालावलेल्या पाणीसाठ्यामुळे उद्यापासून शहरात 'एक दिवसाआड' पाणीपुरवठा; महापालिकेचा मोठा निर्णय
- 'एल निनो'च्या संकटावर 'एआय'चा उतारा! महाराष्ट्रातील ४० लाख शेतकऱ्यांना होणार फायदा; कृषी विभागाकडून हायटेक प्रणाली सज्ज
- बळीराजाला सर्वात मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सुरू, थेट बँक खात्यात निधी जमा होण्यास सुरुवात; एकनाथ शिंदेंची मोठी माहिती
महाराष्ट्र
- पुणेकरांच्या चिंतेत वाढ! धरणांतील खालावलेल्या पाणीसाठ्यामुळे उद्यापासून शहरात 'एक दिवसाआड' पाणीपुरवठा; महापालिकेचा मोठा निर्णय
- 'एल निनो'च्या संकटावर 'एआय'चा उतारा! महाराष्ट्रातील ४० लाख शेतकऱ्यांना होणार फायदा; कृषी विभागाकडून हायटेक प्रणाली सज्ज
- बळीराजाला सर्वात मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सुरू, थेट बँक खात्यात निधी जमा होण्यास सुरुवात; एकनाथ शिंदेंची मोठी माहिती
- सोलापूर आयटी पार्कचा मार्ग मोकळा! कृष्णा खोरे नियामक मंडळाकडून लॉजिस्टिक पार्कचा जुना ठराव रद्द; २० हेक्टर जागा एमआयडीसीकडे हस्तांतरित होणार
गुन्हा
- मुंबई: बीकेसीमध्ये धावणार देशातील पहिली 'पॉड टॅक्सी'! स्वप्न की वास्तव? प्रकल्पाच्या उपयुक्ततेवर उपस्थित झाले प्रश्नचिन्ह.
- बीड हादरले! तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार, फोटो-व्हिडिओच्या जोरावर ब्लॅकमेलिंग; अंबाजोगाई परिसरातील धक्कादायक प्रकार
- पुण्यात थरार! महिलेशी चॅटिंगच्या संशयातून तरुणाचे अपहरण; दिवेघाटात सिनेस्टाईल पाठलाग करत पोलिसांकडून सुटका.
- अमेरिका: हैदराबादचा तरुण अंशुल कुंचा याचा 'फेक' पिझ्झा डिलिव्हरीच्या जाळ्यात अडकवून गोळ्या झाडून खून!
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
- भाजप पदाधिकारी अजित आचरेकरला DRI कडून बेड्या; संजय राऊतांचा रवींद्र चव्हाणांवर गंभीर आरोप!
इतर
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
- दैनिक राशिभविष्य ७ जून २०२६: आज कोणत्या राशींवर असेल गणपती बाप्पाची कृपा? जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य ६ जून २०२६ : या राशींना मिळणार नोकरीत प्रमोशन तर काहींचा वाढणार खर्च!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- महायुद्धाचा भडका! इस्रायलकडून इराणमधील प्रमुख शहरांवर भीषण हल्ला; प्रत्युत्तरात इराणकडून ३० क्षेपणास्त्रांचा मारा, 'ऑपरेशन नस्र' सुरू
- दिल्ली: विमानतळावर निसर्गाचा तडाखा! वादळामुळे एअर इंडियाच्या तीन विमानांचे नुकसान; लोखंडी स्टॅण्ड झाले 'खेळणी'
- भंडारा: वैनगंगा नदीत बोट उलटून दोन तरुणांचा बुडून मृत्यू; पाच जण सुदैवाने बचावले!
- अमेरिका: हैदराबादचा तरुण अंशुल कुंचा याचा 'फेक' पिझ्झा डिलिव्हरीच्या जाळ्यात अडकवून गोळ्या झाडून खून!


























Subscribe to my channel


