Sharad Pawar : राज्यात धार्मिक दंगली जाणीवपूर्वक घडवल्या जात आहेत; शरद पवार गंभीर आरोप

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. "राज्यात सातत्याने दंगली घडून येत आहेत. धार्मिक दंगल मर्यादित भागात झाली असेल तर फार चिंतेचा विषय नाही. मात्र असे प्रकार घडत नसून, ते जाणीवपूर्वक घडवले जात आहेत, असा आरोप शरद पवारांनी केला आहे. 

शरद पवार हे सद्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. आज सकाळी सव्वा नऊच्या सुमारास त्यांनी शहरातून पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देत, विविध मुद्द्यावर भाष्य केले. राज्यात सातत्याने घडून येणाऱ्या धार्मिक दंगलीबाबतही पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

“देशात सध्या मुस्लिम आणि ख्रिश्चन या दोन धर्मांबाबत चिंता वाटावी, अशी परिस्थिती आहे. व्यक्तिगत कारणातून समाज आणि चर्चवर हल्ला करणे चूक आहे. मुस्लिम समाजात चार-दोन चुका होऊ शकतात, तशा गोष्टी हिंदूंकडूनही होऊ शकतात, असं शरद पवार म्हणाले.

“समाज एकसंध करायचा असेल तर एखादा घटक मागास ठेऊन होऊ शकत नाही. पण काही लोक जाणीवपूर्वक भेदभाव करत आहेत. हे मोठं आव्हान देशासमोर मला दिसत आहेत. लोकांनी एकजुटीने द्वेषाच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे. देश आणि समाज एकसंघ ठेवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे”, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली. 

"राज्यात सातत्याने दंगली घडून येत आहेत. धार्मिक दंगली मर्यादित भागात झाली असेल तर फार चिंतेचा विषय नाही. मात्र असे प्रकार घडत नसून, ते जाणीवपूर्वक घडवले जातात. मी काल एका वाहिनीवर पाहिलं की, कोणीतर गर्दीत कुणीतरी औरंगजेबाचा फोटो दाखवतो आहे. आता या गोष्टीसाठी इतर ठिकणी दंगल करायचं कारण काय? यासाठी पुण्यात आंदोलन करायची काय गरज आहे", असा सवाल पवारांनी विचारला आहे



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply