Sharad Pawar Autobiography: आजवरचा सर्वात मोठा खुलासा; अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांच्या आत्मचरित्रात सविस्तर उल्लेख

Mumbai News : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' भाग 2 चं प्रकाशन आज होत आहे. या पुस्तकातून अनेक अनुत्तरित राजकीय प्रश्नांची उत्तर मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी आणि महाविकास आघाडीची स्थापना कशी झाली? याचा उलगडा पुस्तकातून झाला आहे.

अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधाबाबत अनेक तर्कवितर्क आजही लावले जातात. मात्र अजित पवार यांनी असं पाऊल का उचललं याचा खुलासा शरद पवारांच्या आत्मचरित्रातून समोर आला आहे.

काँग्रेस नेत्यांच्या आडमठेपणाच्या भूमिका

सरकार स्थापनेची चर्चा सुरु असताना काँग्रेससोबत चर्चा फार निखळ स्वरुपाची होत नव्हती. काँग्रेस नेत्यांच्या आडमठेपणाच्या भूमिकेमुळे चर्चेत रोज अडचणी येत होत्या. आम्ही अतिशय सामंजस्य पद्धतीने काँग्रेसला समजून घेत होतो. परंतु त्यांचा प्रतिसाद काहीसा अडेलतट्टू होता., असं पुस्तकात म्हटलं आहे.

घडलेला प्रकार धक्कादायक तर होताच, परंतु दिशाभूल करून घडवण्यात आला होता. 'महाविकास आघाडी'चा यशस्वी होऊ घातलेला पट उचलून लावण्यासाठी केंद्र सरकार, राजभवन आणि राज्यातल्या भाजपानं केलेला हा रडीचा डाव होता.

पहिला फोन उद्धव ठाकरेंना केला

घटनेनंतर मी पहिला फोन उद्धव ठाकरेंना केला आणि राजभवनात पहाटे घडलेल्या नाट्याची त्यांना कल्पना दिली. त्यांना ही माहिती सर्वप्रथम माझ्याकडूनच मिळत होती. अजितनं उचललेलं पाऊल अत्यंत गैर असून, याला राष्ट्रवादी काँग्रेसचा अजिबात पाठिंबा नाही,' असं मी त्यांना निःसंदिग्ध शब्दांत सांगितलं, असा उल्लेख पुस्तकात करण्यात आला आहे.

एकत्रित बैठकांचा सपाटा सुरू असतानाच अशाच एका बैठकीत संगत राहणं अवघड गेलं. यापुढे बोलण्यात अर्थ नाही, अशी भावना झाली. सरकारस्थापनेत एक नाट्यमय वळण येणार आहे याची आम्हा कुणालाच कल्पना नव्हती. अजित भावनाप्रधान आहे आणि तिरीमिरीत त्यानं हे पाऊल उचललं असावं, असा माझा अंदाज होता, असं शरद पवारांना पुस्तकात म्हटलं.

अजित पवारांचं बंड कसं मोडलं?

मात्र त्यानंतर आम्ही पहिला निर्णय घेतला, तो बंड मोडुन काढण्याचा. आमच्या पदाधिकाऱ्यांशी आणि सहकाऱ्यांशी बोलून गेलेल्या सर्व आमदारांना परत आणण्यासाठी पावलं उचलायला मी सांगितली. 'चव्हाण प्रतिष्ठान'ला राष्ट्रवादीचे चोपन्नपैकी पन्नास आमदार उपस्थित असल्यानं तशीही बंडातली हवा निघालीच होती.

तरीही महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत नेमकी माहिती पोहचणं आवश्यक होतं. त्याचाच भाग म्हणून आम्ही पत्रकारपरिषद घेतली. दुपारी झालेल्या या पत्रकारपरिषदेला उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेतेही उपस्थित राहिल्यानं 'महाविकास आघाडी' अभेद्य असल्याचा पक्का संदेश गेला, असंही पुस्तकात सांगण्यात आलं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply