
Sharad Pawar On Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीवर गौप्यस्फोट केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मी त्यावर (देवेंद्र फडणवीसांनी पहाटेच्या शपथविधीवरील केलेल्या गौप्यस्फोटावर) भाष्य करून त्यांचं महत्व वाढवायची गरज नाही, असे शरद पवार म्हणाले. 'सकाळ’ माध्यम समूहाच्या वतीने पुण्यात दुसऱ्या सहकार महापरिषदेचे (सकाळ महाकॉन्क्लेव्ह) आयोजन करण्यात आले आहे. या महापरिषदेचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमानंतर शरद पवार यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी पहाटेच्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या गौप्यस्फोटावर विचारलेल्या प्रश्नावर बोलताना पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या दाव्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, 'त्यावर भाष्य करून त्यांचं महत्व वाढवावं असं मला वाटत नाही.' दरम्यान, इतक्या दिवसांनी हा विषय का काढला या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिले. याबाबत फडणवीसांनाच विचारण्याची गरज आहे, असे पवार म्हणाले.
शरद पवार यांनी राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीवरही प्रतिक्रिया दिली. मंगळवारी निर्णय घेणार असल्याचं आज ऐकण्यात आलं आहे. बघू आता मंगळवारी काय होतं? इंटरेस्टिंग आहे. काय होतं हे सांगणं अवघड आहे, असं ते म्हणाले.
कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरणार?
शरद पवार हे कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरणार असल्याचं वृत्त होतं. त्याबाबत विचारलं असता, कसबा पोटनिवडणुकीचे उमेदवार मला भेटून गेले. त्यांनी मला एखादी चक्कर टाका असे सांगितले. आता एका ठिकाणी गेलं की दोन्ही ठिकाणी (कसबा आणि चिंचवड) जावं लागेल, असे ते म्हणाले.
दुसरीकडे, गिरीश बापट हे प्रचारात सहभागी झाल्यानंतर भाजपवर विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्याबाबतही पवार यांनी भाष्य केले. बापट यांना प्रचारात आणण्याची भाजपला गरज होती का हे ठाऊक नाही. बापट यांना मी भेटून आलो होतो. त्यांची प्रकृती पाहता त्यांच्या यातना वाढू नयेत हीच अपेक्षा आहे, असे शरद पवार म्हणाले.
शहर
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! सोलापूरजवळील टिकेकरवाडी यार्डाचा कायापालट; गाड्या धावणार आता अधिक वेगाने आणि सुरक्षित!
गुन्हा
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- पुणे-नाशिक महामार्गावर संतापजनक घटना; तरुणीला ओढून नेऊन कालव्यात फेकले, नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- कल्याणमध्ये क्रूरतेचा कळस! हुंड्यासाठी गर्भवती महिलेचे मुंडण, गरम पाण्याने चटके देत सासरच्यांनी केला छळ!
राजकीय
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय वादळ; धानोरकर-वडेट्टीवार यांच्या दोन 'व्हीप'मुळे नगरसेवक संभ्रमात!
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
इतर
- आजचे राशिभविष्य १४ जून २०२६: बाप्पा आणि हनुमानजींच्या कृपेने कोणत्या राशींचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- अमेरिका-इराण शांतता करार: इराणकडून तुर्की, इराक आणि इजिप्तशी चर्चा; पंतप्रधान मोदींनी केले स्वागत
- ब्रिटनचा ऐतिहासिक निर्णय! १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी; ऑनलाइन सुरक्षिततेसाठी मोठे पाऊल
- इंधन दरांचा खेळ! पाकिस्तानमध्ये पेट्रोल स्वस्त तर भारतात महाग; दोन्ही देशांच्या दरामागचे अर्थकारण काय?
- बापरे! हवेतच दोन हेलिकॉप्टरची भीषण धडक; अपघातात ६ जणांचा मृत्यू, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर!























Subscribe to my channel



