Shahapur Accident : भीषण अपघाताने राजा-राणीचा सुखाचा संसार उद्ध्वस्त; ५ वर्षाची चिमुकली पोरकी, हृदय हेलावणारी घटना

Shahapur Accident : मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात ८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या भीषण अपघातात एका जोडप्याचाही मृत्यू झाला. तर या जोडप्याची पाच वर्षाची चिमुकली थोडक्यात बचावली असून तिच्यावर रुग्णलयात उपचार सुरु आहेत. आई-वडिलाच्या मृत्यूने वयाच्या पाचव्या वर्षी चिमुकली पोरकी झाली.

सध्या ५ वर्षीय चिमुकली जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अवघ्या वयाच्या पाचव्या वर्षी आई-वडिलांचा आधार गेल्याने तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघातात चिमुकलीच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला. मुंबई-नाशिक महामार्गावर पहाटेच्या सुमारास ५ वाहनांचा विचित्र अपघात झाला. त्यात ३ जणांचा मृत्यू झाला. तर १४ जण जखमी झाले. तर या जखमींपैकी ८ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

Nagpur Crime: नागपूरमध्ये चाललंय काय? आधी चाकूनं भोसकलं, नंतर दगडाने मारहाण; तरुणाचा तडफडून मृत्यू

अपघातामधील जखमींवर ठाणे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पियुष पाटील आणि रूंदा पाटील या आई वडिलांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांची 5 वर्षीय मुलगी जखमी झाली आहे. या मुलीवर शहापूर येथील क्रीस्टीकेअर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

चोपडा बदलापूर ट्रॅव्हल्सच्या अपघातात जोडप्याचा मृत्यू

मुंबई-नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. १५ रोजी पहाटे ३.३४ वाजता झालेल्या अपघातात अमळेरच्या जोडप्याचा मृत्यू झाला. दोघे चोपडा बदलापूर ट्रॅव्हल्स बसने प्रवास करत होते. त्यांची बस मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर येथील पुलावर आल्यानंतर कंटेनर, ट्रक आणि श्री गणेश राम ट्रॅव्हल्स खासगी बसचा अपघात झाला. या पाच वाहनांच्या विचित्र अपघातात अमळनेरचे पियुष पाटील आणि वृंदा पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पियुष हे मुंबई महापालिकेत नोकरीला होते, तर वृंदा या बोरगावमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत युवा प्रशिक्षणार्थी होत्या.

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply