Section 144 in Mumbai: मुंबईत आजपासून ११ जूनपर्यत जमावबंदी लागू; काय आहेत कारणं?

Section 144 in Mumbai : मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा शहरात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलिसांनी शहरात जमावबंदी लागू केली आहे. आजपासून (सोमवार २९ मे) येत्या ११ जूनपर्यंत पोलिसांनी हे जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. 

पोलिसांनी शांततेचा भंग, सार्वजनिक शांतता बिघडवणे अशा घटना टाळण्यासाठी ५ किंवा अधिक व्यक्तींच्या हालचाली आणि बेकायदेशीरपणे एकत्र येण्यावर निर्बंध घातले आहेत. मुंबईत शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था बाधित होण्याची शक्यता आहे.

यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होण्याचा धोका असल्याने पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली आहे. मुंबई पोलिसांचे ऑपरेशन्सचे डीसीपी विशाल ठाकूर यांनी हा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा फिरण्यासाठी बाहेर पडत असाल तर तुम्हाला आता काळजी घ्यावी लागेल.

कलम १४४ अंतर्गत कोणकोणत्या गोष्टीवर बंदी

- पाच पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास मनाई आहे.

- मिरवणुकांवर बंदी असेल.

- फटाके फोडण्यास मनाई आहे.

- लाऊडस्पीकरच्या वापरावर बंदी.

- मिरवणुकीत बॅण्डला मनाई आहे.

- परवानगीशिवाय सामाजिक मेळावे करण्यास मनाई आहे.

- आंदोलने/उपोषणास मनाई आहे.

दरम्यान, नागरिकांनी लक्षात घ्यावं की, मुंबईत शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे, संचारबंदी नाही. जमावबंदी आणि संचारबंदी यामध्ये फरक आहे. संचारबंदीमध्ये लोकांच्या घराबाहेर पडण्यावर निर्बंध लागू केले जातात. जमावबंदी आदेश म्हणजे पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींचे एकत्र येण्यास बंदी. जमावबंदीच्या आदेशामध्ये खासगी, सार्वजनिक ठिकाणांचा समावेश होतो. जमावबंदीचे आदेशही फौजदारी दंड संहितेच्या १४४ कलमान्वये जारी केले जातात.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply