राज्यपालांनी अधिकारांचा अमर्याद वापर केला, भगतसिंह कोश्यारींच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने ओढले ताशेरे

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबच सुप्रीम कोर्टामध्ये  सुनावणी सुरु आहे. या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने आपली निरिक्षणं मांडली आहेत. यावेळी सुप्रीम कोर्टाने तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत. 'राज्यपालांनी अधिकारांचा अमर्याद वापर केला.', असे सांगत सुप्रीम कोर्टाने त्यांना खडेबोल सुनावले आहेत. 

सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान पहिली तीन निरीक्षणं ठाकरे गटाच्या वतीने मांडली. राज्यपालांनी अधिकारांचा अमर्याद वापर केल्याचे मत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी नोंदवत त्यांनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारीच्या भूमिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

राज्यपालांच्या समोर सरकार अल्पमतात आल्याचा कुठलाही ठोस आधार नसताना एकनाथ शिंदेना सरकार स्थापन करण्यासाठी बोलवणं हे अयोग्य, असल्याचे मत सुप्रीम कोर्टानेव्यक्त केले आहे. तसंच, शिवसेना पक्षाचे अंतर्गत वाद सोडवण्यासाठी राज्यपालांनी त्यांचे अधिकार वापरण अयोग्य आहे. राज्यपालांनी अधिकारांचा चुकीचा वापर केला.' असे देखील सुप्रीम कोर्टाने सांगितले.

दरम्यान, गेल्या 10 महिन्यांपासून सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय सुनावला आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचे हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे वळवण्यात आले आहे. याप्रकरणी निकाल वाचताना सरन्यायाधीश डी.वाय चंद्रचूड यांनी हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवण्यात आल्याचे सांगितलं. तसेच याप्रकरणी नवाब रेबिया प्रकरण लागू होत नाही, असं ही या घटनापीठाने स्पष्टपणे सांगितले आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply