
Mumbai : 'साराभाई व्हर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतिश शाह यांचं वयाच्या ७४व्या वर्षी निधन झालं आहे. भारतीय चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक अशोक पंडित यांनी या बातमीला दुजोरा देत म्हटलं आहे की, ते आता या जगात नाहीत. किडनी फेल झाल्यामुळे त्यांना शनिवारी दुपारी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयातच अभिनेत्यानं जगाचा निरोप घेतला. या बातमीनं संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला असून चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकार शोक व्यक्त करत आहेत.
अशोक पंडित यांनी सतिश शाह यांच्या निधनाची माहिती दिली. अशोक पंडित यांनी एक व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'तुम्हाला कळवताना खूप दुःख होत आहे की, आमचे प्रिय मित्र आणि हरहुन्नरी अभिनेते सतिश शाह यांचं काही तासांपूर्वी किडनी फेल्युअरमुळे निधन झालं. त्यांना हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आलं, तिथं त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आमच्या इंडस्ट्रीसाठी हे मोठं नुकसान आहे. ओम शांती.'
|
Pune : फटाक्यांच्या वादातून भयंकर राडा; दोन कुटुंबांच्या हाणामारीत तरुणाचा मृत्यू, अनेक जखमी |
सतिश शाह यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक संस्मरणीय भूमिका केल्या, पण 'साराभाई व्हर्सेस साराभाई' मध्ये इंद्रवर्धन साराभाई, ज्याला इंदू म्हणूनही ओळखलं जातं, या भूमिकेने त्यांना घराघरात लोकप्रिय केलं. या कॉमेडी शोमध्ये त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयानेप्रेक्षकांचं मन जिंकलं. 'साराभाई व्हर्सेस साराभाई' हा एकेकाळी टीव्ही इंडस्ट्रीतील टॉप कॉमेडी शो होता आणि आजही, त्यातील व्हिडिओ क्लिप्स दररोज सोशल मीडियावर व्हायरल होतात.
सतिश शाह यांनी कल हो ना हो, जाने भी दो यारों, मैं हूं ना यांसारख्या अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. सतिश शाह यांचा जन्म गुजरातमधील मांडवी येथे झाला आणि त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये अभिनयाचा अभ्यास केला आणि नंतर इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं.
सतिश शाह यांनी १९७० मध्ये 'भगवान परशुराम' चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं, पण त्यांना खरी ओळख अरविंद देसाई यांच्या 'अजीब दास्तान' चित्रपटाद्वारे मिळाली. यानंतर त्यांनी गमन, उमराव जान, पुराण मंदिर, आशिक आवारा, कभी हान कभी ना, हम आपके है कौन, हम साथ साथ है, कहो ना प्यार है, मस्ती, मुझसे शादी करोगी, जाने भी माँ न हो, यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.
शहर
- पुणे: तुझ्या तोंडात विरोधकांनी शोधलेला सोन्याचा चमचा मला कधीच दिसला नाही; आप्पासाहेब पवारांच्या काळापासूनचा संघर्षाचा प्रवास सांगत रोहित पवारांच्या वडिलांची अत्यंत भावनिक पोस्ट
- मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांवर मुंबईबाहेर जाण्याची वेळ; ४९ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा एल्गार, २५ ऑक्टोबरला आझाद मैदानात पुन्हा धडकण्याचा इशारा
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
महाराष्ट्र
- पुणे: तुझ्या तोंडात विरोधकांनी शोधलेला सोन्याचा चमचा मला कधीच दिसला नाही; आप्पासाहेब पवारांच्या काळापासूनचा संघर्षाचा प्रवास सांगत रोहित पवारांच्या वडिलांची अत्यंत भावनिक पोस्ट
- मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांवर मुंबईबाहेर जाण्याची वेळ; ४९ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा एल्गार, २५ ऑक्टोबरला आझाद मैदानात पुन्हा धडकण्याचा इशारा
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
गुन्हा
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान






















Subscribe to my channel


