Sarpanch Pravin Gopale News : सर्वांत माेठी बातमी; राष्ट्रवादीच्या सरपंचाच्या खून प्रकरणी चाैघे पाेलिसांच्या ताब्यात

Maval News : प्रति शिर्डी म्हणून सर्वांना परिचित असलेल्या शिरगाव येथील सरपंच प्रवीण गोपाळे यांची रविवारी रात्री नऊच्या सुमारास जमिनीच्या वादातून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पाेलिसांनी चाैघांना ताब्यात घेतले आहे.

या हत्येपूर्वी संशयित आरोपींनी रेकी केली होती. यामध्ये आधी दोघांनी त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत तिघांनी रेकी करून खात्री केली. सरपंच प्रवीण गोपाळे असल्याची खात्री पटताच त्यानंतर पंचवीस सेकंदात हत्या केली अशी माहिती समाेर आली आहे.

या हत्येपूर्वी संशयित आरोपींनी रेकी केली होती. यामध्ये आधी दोघांनी त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत तिघांनी रेकी करून खात्री केली सरपंच प्रवीण गोपाळे असल्याची खात्री पटताच त्यानंतर पंचवीस सेकंदात हत्या केली अशी माहिती समाेर आली आहे.

ही हत्या जमिनीच्या वादातून झाली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. चौकशी अंतिम प्रमुख कारण समाेर येईलच असेही पाेलिसांनी नमूद केले. पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ म्हणाल्या सध्या महेश भेगडे, अशोक कांबळे, मनीष ओव्हाळ, आणि अमोल गोपाळे या चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चाैकशी सुरु आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *