Sarangkheda Police : दुचाकीवर छुप्या पद्धतीने गांजा तस्करी; सारंगखेडा पोलिसांची कारवाई, एकाला घेतले ताब्यात

Nandurbar : अंमली पदार्थ तसेच गांजा तस्करी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. असे असताना देखील गांजाची तस्करी मोठ्या प्रमाणात केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. अशाच प्रकारे शहादा तालुक्यात होत असलेली गांजा तस्करी सारंगखेडा पोलिसांनी रोखली आहे. या कारवाईत सुमारे एक लाख दोन हजार ५०० रुपये किमतीचा पाच किलो गांजा जप्त करत एकास ताब्यात घेतले आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील अमरद बारंजवण परिसरात गुरुवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश नावरे यांना शिरपूर ते शहादा दरम्यान गांजाची अवैध तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर सारंगखेडा पोलिस गेल्या दोन दिवसांपासून गांजाची तस्करी करणाऱ्यांचा शोध घेत होते. पहिल्यांदा कोणतेही यश आले नाही. मात्र, सापळा लावून संशयिताला शिरपूर दिशेने येताना गांजासह तस्करी करताना बेड्या ठोकल्या.

Beed Crime : बीडमध्ये गुंडाराज सुरूच! संतोष देशमुखांनंतर पवनचक्की वादातून पुन्हा गोळीबार, एकाचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार सारंगखेडा पोलिसांनी सापळा रचला. त्यात संशयित दुचाकीवर गांजा घेऊन येत असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी दुचाकीस्वाराला थांबवून तपासणी केली असता त्याच्या दुचाकीच्या डिकीत ठेवलेला पाच किलो वजनाचा गांजा मिळून आला. शिरपूर रस्त्यावरिल अमरद टेंकवाजवळ पोलिसांनी हि कारवाई केली आहे.

मुद्देमालासह एकजण ताब्यात

सारंगखेडा पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाच किलो गांजा आणि दुचाकी असा एक लाख दोन हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तर गांजा तस्करी करणाऱ्या मधूसिंह गायकवाड (रा. काटविहीर, ता. शहादा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान या कारवाईमुळे पुन्हा एकदा गांजाची तस्करी सुरूच असल्याचे समोर आले आहे

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply