Sant Tukaram Maharaj Palkhi : तुकोबांच्या पालखीचे देहूतून प्रस्थान; देऊळवाड्यात राज्यभरातून हजारो वारकऱ्यांची उपस्थिती

Sant Tukaram Maharaj Palkhi : तुकाराम, तुकाराम असा नामघोष आणि टाळमृदंगाच्या गजरात सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने शुक्रवारी (ता. २८) दुपारी अडीच वाजता देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. हातात भगाया पताका घेऊन आषाढी वारीसाठी निघालेल्या वारकऱ्याऱ्यांनी केलेल्या टाळ-मृदंगाचा गजर आणि ज्ञानोबा-तुकारामाच्या नामघोषात देहूनगरी दुमदुमली.

भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या वैष्णवांनी आनंदाने दिंड्यामध्ये विविध खेळ खेळले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून चालल्या हजारो वारकऱ्यांनी देऊळवाड्यात पालखी प्रस्थान सोहळा 'याची देही, याची डोळा' अनुभवला.

Dharashiv News : मुकबधीर मुलीवर अत्याचार प्रकरणी वसतिगृहातील कर्मचा-यास आजन्म कारावास

तिरिवाजानुसार, पालखी प्रस्थान सोहळ्याचे पारंपरिक कार्यक्रम पहाटे साडेचारपासून सुरू झाले. साडेचार वाजता काकडा झाला. पाच वाजता संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात पालखी सोहळा प्रमुख संतोष महाराज मोरे, विश्वस्त अजित महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा झाली.

सस्थानच अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त भानुदास महाराज मोरे, संजय महाराज मोरे याच्या हस्ते विठ्ठल- तावमणीची महापूजा झाली. साडेपाच वाजता जनक तपोनिधी नारायण महाराज यांच्या समाधी मंदिरात पालखी नौहका प्रमुख माणिक महाराज मोरे, सतोष महाराज मोरे, विशाल महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा झाली.

भजनी मंडपात सकाळी दहा वाजता भानुदास महाराज मोरे यांचे काल्याचे कीर्तन आले. सकाळी साडेदहा वाजता सत तुकाराम महाराज याच्या पादुका घोडेकर बधू (सराफ) यानी चकाकी देऊन इनामदार वाडधात आणल्या.

इनामदारवाडयात दिलीप महाराज गोसावी इनामदार यांच्या हस्ते पादुकाची पूजा आली. मानकरी म्हसलेकर विडी पानी शेक्यावर पादुका घेऊन संबळ, टाळमृदंग आणि तुतारी या वाद्यांसह वाजतगाजत मुख्य मदिरातील भजनी भपात आणल्या.

दुपारी दोन वाजता पालखी प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाली. देऊळवाड्यातील भजनी मंडपात पादुका आणि माउलीच्या पादुकांची जालना जिल्ह्यातील वाकुलोणी गावातील पूजेचे मानकरी ठरलेले ज्येष्ठ वारकरी नाना महाराज तावर, खासदार श्रीरंग बारणे, सुनेत्रा पवार, आमदार महेश लांडगे

सुनील शेळके, अचिनी जगताप, उमा खापरे, आळंदी संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ, राजेंद्र उमाप, ही भावार्थ पाच्या हस्त महापूजा आणि आरती झाली. कोथरूड येथील ग्रामोपाध्याय सुहास टकसाळे यानी पौराहित्य केल पालम महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, संजय महाराज मार, अजित महाराज मार, भानुदास महाराज मारे, नगराध्यक्षा पूजा दिवटे व इतर उपस्थित होते.

दरम्यान, सकाळी नऊ वाजता महाद्वारातून मानाच्या दिंड्याना देऊळवाड्यात प्रवेश देण्यात आला. मंदिर प्रदक्षिणा यानंतर विडचा पान दरवाज्यातून बाहेर पडत होत्या. अकलूज वेथील मोहिते-पाटील व बाभूळगावकर वाच्या नभानी महाद्वारातून प्रवेश केला. पादुका पूजनानंतर फडकरी, मानकरी दिंडीप्रमुख याचा संस्थानतर्फे सत्कार करण्यात आला.

देऊळवाचात फुलांनी सजविलेल्या पालखीमध्ये पादुका ठेवण्यात आल्या. मंदिर प्रदिक्षणा सुरू होताच आनांचा तुकारामचा नामघोष आणि विठुनामाचा गजर झाला. वारकरी फुगडचा धरू लागले. देहभान विसरून नाचू लागले मालाच्या दिल्या अन मानाचे अख साज्ज होते.

बाधावर गरुडटक्के होते. चोपदारही होते. प्रदक्षिणेनतर सायंकाळी सोहळा इनामदार वाड्यात मुक्कामी पोचला. प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने देऊळवाड्यात फुलाची आकर्षक सजावट राजगुरुनगर येथील डोरे यांच्यावतीने राग्यात आली होती.

आज आकुर्डीत मुक्काम

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा शनिवारी (ता. २९) इनामदारवाड्यातून आकुर्डीकडे मार्गस्थ होईल. अनगडाशात बाबा यांच्या दर्गाजवळ अभंग, आरती होईल, तसेच चिंचोली पादुका येथे अभंग, आरती होईल. निगडीत दुपारी भोजन करून पालखी सोहळा रात्री आकुडींतील विठ्ठल मंदिरात मुक्काम करणार आहे. देऊळवाडा आणि परिसरात घोता पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply