Sanjay Raut : शिंदे गँगला 31 डिसेंबरनंतर जावंच लागेल, ठाकरेंच्या मुंब्रा दौऱ्यापूर्वी संजय राऊतांनी रणशिंग फुंकलं, पोलिसांनाही चॅलेंज

Sanjay Raut : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे  यांच्या ठाणे-मुंब्रा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत  यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. "आज संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुंब्रा इथं जाणार आहोत, विरोधकांचा समचार नाही तर छातीवर पाय देऊन समाचर घेऊ", असं संजय राऊत म्हणाले. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.

31 डिसेंबरनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नसतील

राज्यात मोगलाई सुरू आहे.आता आमच्या शाखांवर बुलडोझर फिरवत आहेत. बाळासाहेब ठाकरे  या शाखांना मंदिरं मानत होते. उद्धव ठाकरे यांना मुब्र्यात येण्यापासून पोलीस रोखत आहेत. काल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना नोटीस देण्यात आल्या. त्यांना तडीपार करण्याची धमकी देत आहेत. पोलिसांसमोर बॅनर फाडत आहेत.जे आता आम्हाला अडवात होते, त्यावेळी शाखा तोडताना पोलीस कुठे होते?. जे पोलीस शिंदे सरकारची चाकरी करत आहेत त्यांना एवढंच सांगत आहोत, 31 डिसेंबरनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नसतील", असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

Nashik Diwali : दिवाळीत गावी जाणाऱ्यांची लूटमार, जादा प्रवासभाडेबाबत तक्रार करा, नाशिक आरटीओकडून प्रवाशांना आवाहन

पोलिसांना आव्हान, अडवून दाखवा

 मी पोलिस आयुक्तांना आव्हान करतो, आम्ही येत आहोत, तुम्ही आम्हाला अडवून दाखवा.जेव्हा शाखा तोडली जात होती तेव्हा पोलीस झोपेल होते का? आता पोलीस सक्रिय झाले आहेत. आमचा DNA  बाळासाहेब ठाकरे आहे. आम्ही मुंब्राला जाणार आहोत अडवून दाखवा, असं आव्हान संजय राऊत यांनी केलं.

एकनाथ शिंदे गँगला जावच लागेल 

मी वारंवार सांगतोय की एकनाथ शिंदे जास्त दिवस मुख्यमंत्री राहणार नाहीत.एकनाथ शिंदे यांच्या गँगला जावच लागेल. पुढे मुख्यमंत्री कोण असेल हे माहिती नसेल पण सरकार बदलेल. पोलिस आयुक्तांना आव्हान करतो आम्ही येत आहे तुम्ही आम्हाला अडवून दाखवा, असं संजय राऊत म्हणाले. 

अजित पवारांवर प्रतिक्रिया 

आजारी असताना अजित पवार दिल्लीत गेले. हसण्यासारखे आहे. आपल्याकडे तब्येत ठीक नसेल तर आपण त्यांना जाऊन भेटतो, पण इथे उलटे आहे. आजारी माणूस स्वत: जाऊन भेटत आहे, असा टोला संजय राऊतांनी लगावला.   

उद्धव ठाकरे मुंब्रा दौऱ्यावर 

मुंब्य्रातील शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती शाखेवर बुलडोजर फिरवल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. आज उद्धव ठाकरे मुंब्य्रातील शाखेला भेट देणार आहेत. त्यानंतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. यावेळी संजय राऊतही  उपस्थित असतील. शिंदे गटाचे माजी नगरसेवक राजन किणे यांनी बुलडोजर फिरवलेल्या शाखेला  उद्धव ठाकरे हे स्वतः सायंकाळी भेट देणार आहेत.

मुंब्र्यातील शाखेचा नेमका वाद काय? 

मुंब्रा इथं शिवसेनेची शाखा होती. राज्यातील सत्तांतर आणि शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोन गटात शिवसेना विभागली. त्यानंतर शाखा-शाखांवर दोन्ही गटांकडून दावा केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंब्र्यातील शाखेवर दोन्ही गटांनी दावा केला. 2 नोव्हेंबरला मुंब्य्रातील ठाकरे गटाच्या शाखेवर शिंदे गटाने ताबा मिळवत बुलडोझर फिरवल्याचा आरोप आहे. 

आधीची शाखा जमीनदोस्त केल्यानंतर शिंदे गटाने त्याच ठिकाणी कंटेनर शाखा बसवली आहे. ही शाखा तात्पुरती असल्याचे सांगण्यात आले. मुंब्र्यातील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेतील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना बाहेर काढत शिंदे गटाने ही शाखा जेसीबीने जमीनदोस्त केल्याने गोंधळ उडाला होता. 

मुंब्य्रातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आणि सध्या मुख्यमंत्री  एकनाथ शिंदें चे कट्टर समर्थक असणारे राजन किणे  यांच्या नेतृत्वाखाली 40 ते 50 जणांच्या जमावाने शाखेत घुसून शिवसेना ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखाला बाहेर काढल्याचा आरोप आहे. त्यानंतर शाखेवरील बोर्डही काढला आणि शिंदे गटाचा बोर्ड लावून शाखेत प्रवेश मिळवत कब्जा केल्याचा आरोप आहे.  

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

मुंब्रा या ठिकाणी आज उद्धव ठाकरे यांचा दौरा असल्याने ठाणे पोलीस सज्ज झाले आहेत. ठाणे पोलिसांनी मुंब्र्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला आहे. ड्रोनच्या  माध्यमातून पूर्ण दौऱ्यावर लक्ष ठेवलं जात आहे. ठाणे पोलिसांनी SRPF आणि इतर पोलिस दलांसह अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. संपूर्ण रॅली आणि कार्यक्रमावर पोलिस ड्रोनद्वारे लक्ष ठेवणार आहेत. शिंदे पक्ष आणि उद्धव ठाकरे पक्षांच्या सदस्यांसह दोन्ही पक्षांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कलम 149 अंतर्गत नोटीस देण्यात आली होती.  



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply