Sanjay Raut : अशोक चव्हाण २ वर्षांपूर्वीच पक्ष सोडणार होते; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

Sanjay Raut : अशोक चव्हाण  2 वर्षांपूर्वीच काँग्रेस पक्ष सोडणार होते. एकनाथ शिंदे गेले त्यावेळीच चव्हाणांचीही काँग्रेस पक्ष सोडण्याची योजना होती. अशोक चव्हाण हे गेल्या बऱ्याच काळापासून पक्ष सोडण्यासाठी धडपड करत होते. त्यांना आज त्यासाठी मुहूर्त मिळाला, असा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

आमचं टार्गेट आहे BJP संपवणं

BJP ने आमची कितीही लोकं फोडण्याचा प्रयत्न केला तरी मी तुम्हाला सांगतो की, यांच्यापेक्षा जास्तीच्या 10 जागा माविआ जिंकेल. जागावाटपाच्या फॉर्म्यूलावर जवळपास सर्व चर्चा झाली आहे. आमचं टार्गेट BJP संपवणं आहे, अशा शब्दांत संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

अशोक चव्हाणांसोबत विजय वडेट्टीवार हे सुद्धा येणार?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपचा 'हात' धरला आहे. अशात आमदार रवी राणा यांनी मोठा दावा केलाय. अशोक चव्हाण यांच्यासोबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार देखील येणार आहेत, असा दावा रवी राणा यांनी केलाय.

विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेता असले तरी त्यांचं काय सुरू आहे ते मला माहीत आहे. अमरावती जिल्ह्यातील काँग्रेस आमदार देखील भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा देखील रवी राणा यांनी केला आहे.


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *