Sanjay Raut : संजय राऊतांच्या अडचणी वाढणार? विधानसभा अध्यक्षांकडून आजच हक्कभंग समिती नेमली जाण्याची शक्यता

मुंबई : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. विधीमंडळाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. लवकरच हक्कभंग समितीकडून संजय राऊतांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडी काळात बनवण्यात आलेली विशेष हक्कभंग समिती शिवसेना-भाजप सरकारकडून बरखास्त केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. याबाबात नुकतीच शिवसेना-भाजप सरकारमधील प्रमुख नेत्यांची बैठक संपन्न झाली. लवकरच जुनी विशेष हक्कभंग समिती बरखास्त करून शिवसेना भाजप सरकार तर्फे नवीन विशेष हक्कभंग समिती गठित केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

नवीन समितीकडून संजय राऊतांना उद्याच कारणे दाखवा नोटीस बजावण्याची शक्यता आहे. यावर राऊत यांना ४८ तासांत उत्तर द्यावे लागणार आहे. खासदार संजय राऊत यांच्या अडचणी यामुळे वाढण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षांकडून आजच हक्कभंग समिती नेमली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

नवी समिती स्थापन केली जाणार

नव्या १५ सदस्यीय समितीची निवड आजच होणार असल्याची माहिती मिळत आहे. या समितीत सत्ताधारी पक्षाचे १०, तर विरोधी पक्षाचे ५ सदस्य असणार आहेत. समितीचे अध्यक्षपद भाजपच्या वाट्याला जाणार असल्याचंही कळतंय. भाजप आमदार राहुल कुल यांच्या निवडीची दाट शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply