ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल काय म्हणाले राऊत ?
[11:33 am, 14/2/2026] Meenakshee Kulkarni: हे वाचा [11:35 am, 14/2/2026] Bhimrao Gawali: चंद्रपूरमध्ये घडलेल्या घडामोंडीवर शिवसेना- मनसेत जुंपल्याचे पहायला मिळत आहे. संजय राऊत आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आरोप प्रत्यारोप केले आहेत. चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या नगरसेवकांना प्रत्येकी एक कोटी रुपये मिळाल्याचा खळबळजनक दावा संदीप देशपांडे यांनी केला होता. त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत चंद्रपूरमधील स्थानिक राजकीय घडामोडींवर स्पष्टीकरण दिले. चंद्रपूर येथे जे घडले, त्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कोणतीही भूमिका नाही, असे राऊतांनी ठामपणे सांगितले. चंद्रपूरमधील काही स्थानिक लोकांनी त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी पक्षाला अंधारात ठेवून काही निर्णय घेतले असावेत. पक्षाने या घडामोडींना कधीही समर्थन दिलेले नाही, असे त्यांनी अधोरेखित केले. तर त्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही ठाकरेंच्या सेनेला सुनावलं. संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांच्या 50 खोक्यांच्या आरोपांवरून जोरदार प्रत्युत्तर दिलं. जनतेला 50 खोक्यांचे पुरावे सादर केल्यास चंद्रपूर येथील एक खोक्याचा पुरावा देणार असल्याचे ट्वीट त्यांनी केलं होतं.
आज संजय राऊत हे माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांना पुन्हा या घडामोडींवरून प्रश्न विचारण्यात आले. चंद्रपूरमध्ये जे घडलं त्यावर तुम्ही प्रतिक्रिया दिली, मग मनसेच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. त्यावर पुढचा अध्याय म्हणजे काल मनसेच्या नेत्यांनी तुमच्यावर आरोप केले आहेत. मुंबईत अनेक ठिकाणी शिवसेना उबाठाच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मदत केली नाही. अनेक ठिकाणी आम्हाला जागा मिळाल्या नाहीत, अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे केले गेले, अनेक ठिकाणी आमचे उमेदवार असताना एबी फॉर्म दिले गेले. अशी मनसेच्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची भावना आहे. ही भावना राज ठाकरे यांच्यासमोरही व्यक्त करण्यात आली. या सर्व मुद्यावर संजय राऊतांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं.
माझी राज ठाकरेंशी परवा चर्चा झाली. आम्ही बोललो. तुम्ही जे म्हणताय ( कार्यकर्ते बोलले त्याबद्दल), ते जेव्हा स्वत: मनसे प्रमुख राज ठाकरे बोलतील, तेव्हा आम्ही त्यावर आमची प्रतिक्रिया देऊ. आता जे कोण काय बोलतंय, बंद दाराआड, भिंतीआड, त्याच्यावर आम्ही का बोलू? एक लक्षात घ्या मनसे आणि शिवसेना यांची युती अतिशय घट्ट आहे. कोणी काहीही बोललं तरी त्या युतीमध्ये मिठाचा खडा काही पडणार नाही. कोणाची कितीही इच्छा असली तरी ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा पडणार नाही, याचा पुनरुच्चार राऊत यांनी केला
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


