
Pune : जेवणाची चव चांगली न लागल्याने संतापलेल्या कामगाराने हातोड्याने केलेल्या बेदम मारहाणीत आचाऱ्याचा मृत्यू झाल्याची भंयकर घटना पुण्यामध्ये घडली आहे. ही घटना रविवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास उंड्री परिसरातील मिलेनियम लेबर कॅम्प येथे घडली.
शुभम शास्त्री सरकार (वय ६३, रा. पश्चिम बंगाल) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी कमल नारायण मार्डी (वय ४९, रा. जियापूर, पश्चिम बंगाल) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
जेवणाची चव आवडली नाही म्हणून थेट हातोड्याने मारहाण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंड्री भागात एका कन्स्ट्रक्शन साइटवर लेबर कॅम्प आहे. या कॅम्पमध्ये तेथील कामगार राहतात. कमल मार्डी हा कामगार आहे, तर शुभम सरकारवर कामगारांसाठी जेवण करण्याची जबाबदारी होती. रविवारी शुभम सरकार यांनी कॅम्पमध्ये सर्वांसाठी जेवण बनविले होते. त्याची चव न आवडल्याने मार्डी आणि सरकार यांच्यात वादावादी झाली. यातूनच आरोपी मार्डी याने हातोड्याने शुभम सरकार यांना मारहाण केली.
|
Ladki Bahin Yojana : ऑफलाइन अर्ज अधिक; 'लाडकी बहीण'साठी बारामती, आंबेगाव, जुन्नरमधून प्रतिसाद |
हातोडीचा एक घाव सरकार यांच्या नाकावर बसला. यात ते गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी शुभम सरकार यांना तात्काळ उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत उशिर झालेला होता. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या वेळी दोघांच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या रामप्रीत मंडल यांच्या डोक्यातही आरोपी मार्डी याने हातोडा मारला होता. त्यात मंडल जखमी झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी कमल मार्डी याला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोंढवा पोलिस करीत आहेत.
'लेबर कॅम्पमधील मारहाणीची घटना समजताच घटनास्थळी धाव घेऊन कमल मार्डी याला ताब्यात घेतले. दरम्यान, जखमीला डॉक्टरांनी मृत घोषित केल्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला', अशी माहिती कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे यांनी दिली.
शहर
- नागपूर: ३२० विद्यार्थ्यांच्या प्रवेश रद्द प्रकरणावर मोठा घटनाक्रम; न्याय मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी गाठले मुंबईतील 'शिवतीर्थ', विशेष जीआरची मागणी
- मुंबई: कोस्टल रोडवर भीषण अपघात! मध्यरात्री ६ गाड्या एकमेकींवर आदळल्या, महिंद्रा एसयूव्हीला आग; दीड तास वाहतूक विस्कळीत
- पुणे: पुण्यातील लष्करी रुग्णालयातील डॉक्टरांचा चमत्कार; गंभीर हृदयविकार असलेल्या नवजात बालकाला ४० तास जीवनरक्षक प्रणालीवर ठेवून दिले यशस्वी जीवदान!
- अहिल्यानगर: कॉलेजमध्ये वेटरचे काम ते थेट राज्यकर अधिकारी; दिवसभर नोकरी अन् रात्री अभ्यास करत अर्जुन दारकुंडे यांनी रचला इतिहास, जिद्दीची प्रेरणादायी यशोगाथा!
महाराष्ट्र
- नागपूर: ३२० विद्यार्थ्यांच्या प्रवेश रद्द प्रकरणावर मोठा घटनाक्रम; न्याय मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी गाठले मुंबईतील 'शिवतीर्थ', विशेष जीआरची मागणी
- जळगाव: जिल्ह्यात सकाळीच भूकंपाचे जोरदार धक्के! रिश्टर स्केलवर ४.५ तीव्रतेची नोंद, चोपडा, यावल, भुसावळ आणि मुक्ताईनगर हादरले
- मुंबई: कोस्टल रोडवर भीषण अपघात! मध्यरात्री ६ गाड्या एकमेकींवर आदळल्या, महिंद्रा एसयूव्हीला आग; दीड तास वाहतूक विस्कळीत
- पुणे: पुण्यातील लष्करी रुग्णालयातील डॉक्टरांचा चमत्कार; गंभीर हृदयविकार असलेल्या नवजात बालकाला ४० तास जीवनरक्षक प्रणालीवर ठेवून दिले यशस्वी जीवदान!
गुन्हा
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे...
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!



























Subscribe to my channel




