Sangvi Police Action : धुळ्यात गुटख्यासंदर्भात मोठी कारवाई; ४२ लाखांचा गुटखा जप्त

Sangvi Police Action  :  गुटखा विक्रीला बंदी असताना देखील छुप्या पद्धतीने गुटख्याची वाहतूक व विक्री केली जात आहे. अशाच  प्रकारे इंदोरहून कंटेनरमधून वाहतूक केला जात असलेला ४२ लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. सांगली पोलिसांनी ही कारवाई करत मुद्देमाल हस्तगत केला आहे.

शिरपूर तालुक्यातील सांगवी पोलिसांना गुप्त माहितीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे सांगवी पोलिसांनी ही कारवाई केली. इंदोरहुन भिवंडीच्या दिशेने जात असलेला हा गुटख्याने भरलेला कंटेनर नेला जात असल्याची माहिती देखील कारवाईदरम्यान ताब्यात घेतलेल्या कंटेनर चालकाने दिली आहे. या कारवाईत जवळपास ४२ लाखाहुन अधिकचा गुटखा पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्याचबरोबर अवैधपणे गुटख्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेला कंटेनर देखील पोलिसांनी जप्त केला.  

Maharashtra Assembly Winter Session : बीड जाळपोळ कटाचा मास्टरमाईंड शोधा, संदीप क्षीरसागरांच्या मागणीनंतर फडणवीस आणि जयंत पाटलांमध्ये खडाजंगी

अवैधपणे वाहतूक होत असेलल्या गुटखा वाहतुकीवर अनेकदा कारवाई झाली आहे. तरी देखील छुप्या पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. सांगवी पोलिसांनी केलेल्या या कारवाईत जवळपास ६२ लाखाहून अधिकचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या संदर्भात पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply