Sangli Crime : पद्मावती मंदिरातील चोरीचा उलगडा; चोरट्यास ताब्यात घेत साडेनऊ लाखांचे दागिने हस्तगत

Sangli : सांगलीच्या मिरज तालुक्यातील पद्मावती मंदिरात चोरी झाल्याची घटना घडली होती. पोलिसांकडून याचा तपास सुरु असताना चोरीचा अखेर सांगली पोलिसांनी छडा लावला आहे. चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक करत त्याच्याकडून साडे नऊ लाखांचे दागिने हस्तगत केले आहे. याशिवाय पोलिसांकडून त्याची आणखी चौकशी सुरु आहे.

मिरज तालुक्यातील आरग येथील पद्मावती देवीच्या मंदिरातील चोरी प्रकरणी पोलिसांनी अक्षय मोरे या चोरट्याला ताब्यात घेतले आहे. दोन दिवसांपूर्वी मिरज तालुक्यातल्या आरग येथील पद्मावती मंदिरामध्ये चोरी करत देवीच्या अंगावरील दागिने लंपास केले होते. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गतीने तपास करत तासगावच्या पाचवा मैल येथून सापळा रचून दागिने घेऊन निघालेला अक्षय मोरे याला ताब्यात घेतले.

Mahakumbh Mela 2025 : संगमावर पहिल्याच दिवशी ४० लाख लोकांचा स्नान सोहळा, संगमात स्नानाचा उत्सव

चोरट्याकडून चोरीची कबुली

पद्मावती मंदिरातून १८ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. या प्रकरणी पोलिसांनी अक्षय याची अधिक चौकशी केली असता सदरचे दागिने पद्मावती मंदिरातुन चोरी केल्याची कबूली दिली. त्याच्याकडून साडेनऊ लाखांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. या प्रकरणी आणखी चौकशी सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे.

पोलीस ठाण्यातून पळ काढणाऱ्या चोरट्याला पाठलाग करत जेरबंद पुणे, पिंपरी- चिंचवड येथील बजाज चेतक साई सर्व्हिस प्रा.लि. चिंचवड या इलेक्ट्रीक दुचाकी शोरुममध्ये पीडीआय टेक्निशियन म्हणून काम करणारा आकाश गौतम कांबळे (शिंदेवाडी, ता. मिरज) याने शोरुममधील ५ लाख रुपये रोख रक्कम चोरी करून फरार झाला होता. त्याला मिरज शहर पोलिसांना जेरबंद केले आहे. पण मिरज शहर ठाण्यामध्ये त्याला आणले असता तिथूनही पळून जाण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सिनेस्टाईलने पाठलाग करून त्याला बेड्या ठोकल्या. या चोरट्याचा पोलीस पाठलाग करून पकडल्याचे सी सी टिव्ही मध्ये कैद झाले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply