
खानापूर : खानापूरचे सुपूत्र, जवान नायब सुभेदार जयसिंग (बाबू) शंकर भगत (वय ४०) यांचे लेह लडाख विभागातील सियाचिन मध्ये देशसेवेचे कर्तव्य बजावताना निधन झाले. त्यांच्यावर आज, शनिवारी खानापुरात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
जवान नायब सुभेदार जयसिंग (बाबू) शंकर भगत यांचे पार्थिव पुणे येथून सकाळी नऊ वाजता खान्यपूर येथे आणण्यात आले. 'शहीद जवान अमर रहे नायब सुभेदार जयसिंग बाबू भगत अमर रहे भारत माता की 'जय' अशा जयघोषात खानापूर शहरातून अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेत शालेय विद्यार्थी, तरूण वर्ग, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
खानापूर येथील जवान शहीद जयसिंग भगत है सियाचिन येथे भारतीय सैन्यदलात कर्तव्य बजावत होते. दोन दिवसांपूर्वी सियाचिन येथे बर्फवृष्टी झाली होती. त्यावेळी झोपेत त्यांचा मेंदूतील रक्तपुरवठा गोठल्याने ते कोम्यात गेले. सदर घटना त्यांच्या साथीदारांच्या सकाळी निदर्शनास आली. त्यांनी सैन्यदलाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पुढील उपचारासाठी त्यांना चंदीगड येथे दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
शहीद नायब सुभेदार जयसिंग (बाबू) शंकर भगत है सन २००३ मध्ये सैन्य दलात भरती झाले होते. सन २०२६ मध्ये सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा, वडील, भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे
सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान भगत यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा काळीज पिळवटून टाकणारा होता. पत्नी व लहान मुलांचे निशब्द चेहरे पाहून उपस्थितांना अश्रू अनावर झाले. खानापूर गोरेवाडी रस्त्यालगत भगत यांच्या घराच्या पूर्वेला पटांगणावर जवान भगत यांचेवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी भारतीय सैन्यदलाच्या २२ मराठा लाइट इन्फन्ट्रीच्या वतीने पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. लष्करी व शासकीय मानवंदना देण्यात आली.
महाराष्ट्र शासनाच्यावतीने पालक मंत्री सुरेश खाडे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार गोपिचंद पडळकर, माजी आमदार सदाशिवराव पाटील, नगराध्यक्ष डॉ उदयसिंह हजारे, जिल्हाधिकारी डॉ दयानिधी राजा, उपजिल्हाधिकारी विजया पांगारकर, उपविभागीय अधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेत शेळके, पोलीस निरीक्षक संतोष डोके, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण केले
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

