
Sangamner Crime : रागाच्याभरात व्यक्ती कधी काय करेल याचा काहीच नेम नसतो. कोणत्याही नात्यात गैरसमज असल्यास ते नातं आणखी बिघडत जातं आणि त्याचा वाईट शेवट होतो. याचीच प्रचिती संगमनेरमध्ये आली आहे. येथे दोन मित्रांनी आपल्या एका मित्राची निर्घृण हत्या केलीये.
शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून दोघांनी आपल्याच मित्राला दारु पाजून त्याचा खून केल्याची खळबळजनक घटना संगमनेर तालुक्यात घडली आहे. संगमनेर-लोणी रस्त्यापासून सुमारे तीस फूट आतील मैदानात शुक्रवारी रात्री हा प्रकार घडल्याचं उघडकीस आलंय. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आणि अवघ्या दोन तासांतच दोघांना संशयावरुन ताब्यात घेतले आहे. अब्दुल उर्फ अतुल शोभाचंद सावंत असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून या घटनेने संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
|
Sanjay Raut: भारतात सध्या रशिया, चिनी राजकीय पॅटर्न सुरु; राऊतांचा हल्लाबोल |
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी सकाळी समनापूर शिवारातील एका हॉटेल जवळील मोकळ्या पटांगणात गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळावर सापडलेल्या बिअरच्या बाटल्या कोठून आणल्या याचा तपास करुन पोलिसांनी अवघ्या तासाभरातच आरोपींची ओळख पटवली. मात्र अटक होण्याच्या भीतीने दोन्ही संशयीत रात्रीपासूनच पसार झाले होते. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत त्यांचा माग काढण्यास सुरुवात केली आणि पुढील दोन तासातच दोन्ही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
हत्या करणारे दोन्ही आरोपी आणि मयत एकाच समाजाचे आणि नेहमीसोबत राहणारे होते. शुक्रवारी (22 मार्च ) रात्री त्यांनी वडगाव पान जवळील एका बिअर शॉपीमधून तीन बिअरच्या बाटल्या घेतल्या. तिघांनीही समनापूर शिवारातील एका हॉटेल जवळील मोकळ्या पटांगणात बसून त्या रिकाम्या केल्या.
त्यानंतर त्यांच्यात वाद सुरु झाले आणि त्यातून एकाने जवळील चाकू काढून अब्दुल उर्फ अतुल शोभाचंद सावंत ( वय 22, रा. समनापूर ) याचा धारदार चाकूने गळा चिरुन खून केला. घटनेनंतर दोघेही आरोपी तेथून पसार झाले होते. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या घटनेमागे नाजूक कारण असण्याची शक्यता आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत असून हत्येच्या घटनेने संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


