Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी मार्गावर भीषण अपघात; खासगी बसची ट्रकला मागून धडक, वाहनाचा चक्काचूर

Buldana : समृद्धी मार्गावर अपघाताची मालिका सुरुच आहे. समृद्धी मार्गावर आज मंगळवारी पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे. या महामार्गावर खासगी बसने भरधाव ट्रकला धडक दिली. या भीषण अपघातात बसचा समोरील भाग चक्काचूर झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणताही जीवितहानी झालेली नाही.

आज मंगळवारी सकाळी समृद्धी महामार्गावर धावत्या ट्रकला पाठीमागून खासगी प्रवासी बसने धडक दिली. समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातानंतर बस चालक जखमी झाला आहे. या भीषण अपघातात बसचा पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. या भीषण अपघातात सुदैवाने प्रवाशांना कुठलीही इजा झालेली नाही.

Pune : पुण्यातील ६० ते ७० रुग्णालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; ई-मेल प्राप्त होताच पोलिसांची धावपळ

पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मार्गावरील वाहतूक कोंडी कमी केली. पोलिसांनी मार्गावरील गाड्यांना मार्ग मोकळा करून दिला. या अपघातात जखमी बस चालकाला बीबी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर या रुग्णालयात उपचारात सुरु आहेत.

दरम्यान, या भीषण अपघातानंतर ट्रकचा चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी पळून गेलेल्या ट्रक चालकाचा शोध सुरु केला आहे. या अपघातामधील गंभीर जखमी बस चालकावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्यावर बीबी रुग्णालायत उपचार सुरु आहेत. वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. या प्रकरणी किनगाव राजा स्थानिक पोलीस पुढील कारवाई करत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply