Samruddhi Mahamarg : पहाटे डुलकी लागली अन् जीव गमावला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

Nagpur-Mumbai Expressway Accident : समृद्धी महामार्गावरील अपघाताचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. आज पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर अपघात झालाय. मेहकरजवळ आयशर चालकाला पहाटे डुलकी लागली, त्याचं कारवरील नियंत्रण सुटले. झोपेमध्ये आयशर जाऊन समोर उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय.

मेहकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर आयशर आणि ट्रक यांच्यात धडक होऊन एक जण जागीच ठार झाला. पहाटे ५:३० वाजता हा भीषण अपघात झाला. पालघर येथून नागपूरकडे जाणाऱ्या आयशर वाहन चालकाला पहाटे डोळ्यावर झोप आली. चालकाला डुलकी लागल्यामुळे उभ्या ट्रकला पाठीमागून धडकला. या अपघातात आयशर चालक अमित कुमार यादव जागीच ठार झाला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांनी अपघाती मृत्यूची नोंद केली. त्याशिवाय वाहतूककोंडी दूर करत रस्ता मोकळा करून दिला.

Nashik Accident : नाशिकमध्ये भीषण अपघात, कंटेनरने रिक्षाला उडवले, ३ जणांचा मृत्यू, २ गंभीर

समृद्धी महामार्गा अपघातांसाठी कुप्रसिद्ध झालाय. मुंबई ते नागपूर या महामार्गावर वाहतुकीचे प्रमाण अधिक असून, बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक अपघात होत असल्याचे आकड्यातून स्पष्ट झालेय. अपघाताला रोखण्यासाठी शासनाने काही उपाययोजना राबवल्या होत्या, पण अपघाताचे सत्र थांबत नाही. दररोजच समृद्धी महामार्गावर अपघात होत आहेत, आणि त्याचा केंद्रबिंदू म्हणून बुलढाणा जिल्हा ठरतो आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply