Samruddhi Highway : वेगमर्यादा ओलांडाल तर वाहन होईल ब्लॅक लिस्ट; काय आहे समृद्धी महामार्गावरील एक्झिट मॅनेजमेंट सिस्टीम?

Samruddhi Highway News: गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात सर्वांसाठीच चिंतेचा विषय ठरताना दिसत आहेत. हे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. वारंवार वेगावर नियंत्रण ठेवण्याच्या सुचना देवूनही चालकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. यावर आता प्रशासनाने नवीन पर्याय शोधून काढला आहे.

त्यानुसार, समृद्धी महामार्गावर आता एक्झिट मॅनेजमेंट सिस्टीम राबविली जाणार आहे. जर तुम्ही स्पीड लिमिट ओलांडली तर तुमचे वाहन थेट ब्लॅक लिस्ट केले जावू शकते. काय आहे ही एक्झिट मॅनेजमेंट सिस्टीम, चला जाणून घेवू.

समृद्धी महामार्गावरुन जाणाऱ्या वाहनाचा अपघात होऊ नये म्हणून जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन विभाग कडून विविध मोहीम राबवली जात आहेत. यामधे आता परिवहन विभागाकडून वाहनांना ब्लॅक लिस्ट आणि दंड ही केल्या जात आहे. समृद्धी महामार्गावर नागपूर ते मुंबई चार ठिकाणी इंटर चेंज आहे.

जर वाहन एका इंटरचेंजवरून दुसऱ्या इंटरचेंजला ठरलेल्या वेळेच्या आत पोहचले तर त्या टोल नाक्यावर सायरन वाजेल आणि ते वाहन काही वेळेसाठी ब्लॅक लिस्ट होईल. इतकेच नव्हे तर उप प्रादेशिक विभागाकडून त्या चालकाचे समुपदेशन करण्यात येईल.

तसेच त्याला वाहन 120 वेगाच्या आतच चालवण्याचे आवाहनही करण्यात येईल. दरम्यान, चालकाने पुन्हा वेळेची मर्यादा ओलांडली तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यात येणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे आपले वाहन ठरलेल्या वेळेतच चालवावे, अन्यथा आपल्याला दंड ही भरावा लागेल, असे आवाहन उप्रादेशिक परिवहन विभागाने केले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply