Sambhajinagar News : भाजप नेत्याच्या सुसाट कारने पिता-पुत्राला उडवलं; छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली. एका भाजप नेत्याच्या कारने दुचाकीवरून जात असलेल्या पिता-पुत्रांना जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

इसाक शेख आणि अन्वर शेख, अशी जखमी पिता-पुत्रांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जखमी पिता-पुत्र पैठण तालुक्यातील तारु पिंपळवाडी गावातील रहिवासी असून ते सोमवारी लग्नासाठी बाहेरगावी निघाले होते.

Mumbai News : २२ मुलींवर केला अत्याचार, नराधमाची या प्रकरणात झाली निर्दोष मुक्तता

ढाकेफळ रस्त्यावरील वडगाव शिवारात त्यांची दुचाकी आली असता, भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की पिता-पुत्र रस्त्याच्या कडेला जाऊन कोसळले. अपघातानंतर कारची समोरील दोन्ही टायर फुटली. घटनेनंतर कारचालकाने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

इसाक शेख आणि अन्वर शेख, अशी जखमी पिता-पुत्रांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जखमी पिता-पुत्र पैठण तालुक्यातील तारु पिंपळवाडी गावातील रहिवासी असून ते सोमवारी लग्नासाठी बाहेरगावी निघाले होते.

ढाकेफळ रस्त्यावरील वडगाव शिवारात त्यांची दुचाकी आली असता, भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की पिता-पुत्र रस्त्याच्या कडेला जाऊन कोसळले. अपघातानंतर कारची समोरील दोन्ही टायर फुटली. घटनेनंतर कारचालकाने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply