Sambhajinagar Crime : लाचेच्या रक्कमेसह पाेलिसांनी ठाेकली धूम, गंगापूर ठाण्यात गु्न्हा दाखल

Sambhajinagar Crime : छ्त्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाळू वाहतूकदारांकडून 15 हजाराची लाच प्रकरणी दोन पोलिसांवर एसीबीने कारवाई केली आहे. दरम्यान तक्रारदाराच्या तक्रारीनंतर एसीबीने रचलेल्या सापळ्याची पाेलिसांना कुणकुण लागताच दाेघांनी स्वीकारलेली लाचेची रक्कम घेऊन पोबारा केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. गंगापूर पोलिस उपविभागीय कार्यालयात दोघेही पोलिस हवालदार म्हणून कार्यरत हाेते. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
एसीबी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनूसार सुनील रठोड व लक्ष्मीकांत सपकाळ अशी लाचखोर पोलिसांची नावे आहेत. या दोन पोलिस कर्मचारी आणि एका व्यक्तीसह तिघांवर गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नाेंदविण्यात आला आहे.
 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply