Rohit Pawar : 45 कोटींचे विदेश दौरे, फडणवीसांच्या ओएसडीवर 1 कोटी 88 लाखांचा खर्च; रोहित पवारांनी थेट आकडेवारीच मांडली

Rohit Pawar :  रोहित पवार  यांनी मंत्र्यांच्या विदेशी दौरे आणि राज्यातील नोकर भरतीच्या परीक्षेत होणाऱ्या घोटाळ्यावरून सरकारवर टीका केली आहे. याचवेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. फडणवीसांच्या ओएसडीच्या अनेक कंपन्या असून, त्यांच्या संबधित कंपन्यांना परीक्षेचे कामं मिळत आहेत. तसेच, फडणवीसांच्या ओएसडीच्या एका विदेशी दौऱ्यावर 1 कोटी 88 लाखांचा खर्च झाला असल्याचं देखील रोहित पवार म्हणाले आहे. 

याबाबत बोलतांना रोहित पवार म्हणाले की, 23 नोव्हेंबर 2023 ला आम्ही एमआयडीसीकडे  काही माहिती मागवली होती. यामधे विदेशात कोण-कोणते प्रवास झाले आणि त्यासाठी किती खर्च झाला याची माहिती मागवण्यात आली. डाओसमध्ये 32 लाख रुपये खर्च झाला. आत्तापर्यंत 42 ते 45 कोटी रुपये वेगवेगळ्या विदेशी दौऱ्यावर खर्च झाला आहे. तैवान देशात मंत्रीमोहदय गेले नव्हते केवळ अधिकारी तिथं गेले होते. देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी कौस्तुभ ढवसे कशासाठी गेले होते. यासाठी 1 कोटी 88 लाख रुपये खर्च झाला. इतका खर्च कसा काय झाला? तुम्हीं प्राईव्हेट जेटने गेले होते का? कारण 5 लोकांवर 60 लाख रुपये कसा काय केला? असा प्रश्न रोहित पवारांनी केला आहे. 

Wardha Crime News : नायब तहसीलदारांच्या पथकावर वाळू चाेरट्यांचा हल्ला, आर्वीत चौघांना अटक

एमआयडीसीला अधिकचा तपशील मागवला आहे. तैवान येथे एक भारतीय व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला थेट पैसा देण्यात आला. 8 महिन्यांपूर्वी यांनी जो खर्च केला तो कसा दाखवायचा असा प्रश्न आता यांच्या समोर उभा राहिला आहे. यांनी आता मागच्या तारखेचे पत्र देउन खर्च दाखवण्याचा प्रयत्न कौस्तुभ ढवसे करत आहे. जपानला देवेंद्र फडणवीस गेले, तिथं खर्च एमआयडीसीने केला होता. तिथं देखील कौस्तुभ ढवसे कशासाठी गेले होते याचं उत्तर द्यावं? असेही रोहित पवार म्हणाले. 

फडणवीसांच्या ओएसडीच्या कंपन्यांना कंत्राट

सरकारने परदेशात जाऊन केवळ 50 लाखांचे एमओयू केले आहेत हे गंभीर आहे. मग हे परदेशात गेले कशाला. कौस्तुभ ढवसे यांच्या अनेक कंपन्या आहेत. असा व्यक्ती देवेंद्र फडणवीस यांचा ओएसडी झाला कसा काय? याचाच मिञ आयटी घोटाळ्याचा आरोपी आहे. ज्या कंपनीला कंत्राट दिलं होत त्याचा डायरेक्टर कौस्तुभ ढवसे आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात काम करतो. याचा अर्थ त्यांचा याच्याशी संबंध आहे. कारण देवेंद्र फडणवीस सत्तेत असताना हा व्यक्ती त्यांच्या सोबत होता. त्यानंतर सत्ता गेली की हा व्यक्ती गायब झाला आणि आता देवेंद्र फडणवीस सत्तेत आले की पुन्हा कौस्तुभ ढवसे त्यांचा ओएसडी झाला आहे.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply