‘सैराट’ मधल्या ‘आर्ची’च्या भूमिकेतून अभिनयाचं नाण खणखणीत वाजवणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू हिची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. तिच्या ‘आर्ची’ ने सगळ्यांनाच वेड लावलं होते, मात्र ती वन फिल्म वंडर न ठरता, अभिनयाच्या दुनियेत शिरत खाचखळगे, टक्के-टोलपणे खात तिने तिचं अस्तिच्व सिद्ध करून दाखवल. प्रत्येक चित्रपटागणीक प्रगती करत तिने प्रेक्षाकांच्या, चाहत्यांच्या मनात घर केलं. रिकू ही थोडीफार आर्चीप्रमाणेच आहे, तिच्या अभिनयाचप्रमाणेच ती स्पष्टवक्तेपणासाठीही ती ओळखली जाते. ‘सैराट’ नंतरही ती अनेक चित्रपटात दिसली असून सोशल मीडियावरही ती खूप ॲक्टिव्ह असते. तिच्या अकाऊंटवर ती अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना अपेडट देत असते.
रिंकू नुकतीच साडेमाडेतील चित्रपटात झळकली. पण सध्या ती या चित्रपटामुळे नव्हे तर तिच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहे. एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये वैयक्तिक आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले. तसेच तिने तिची अध्यात्मिक बाजू आणि केदारनाथला आलेला विलक्षण अनुभव सांगितला. आधी मी नास्तिक होते, पण काही अनुभवांमुळे अध्यात्मिक झाल्याचे रिंकून नूद केले. यावेळी तिने एक अनुभवही कथन केला, तो ऐकून तुमच्याही अगांवर नक्कीच काटा येईल.
आधी मी नास्तिक होते, पण…
या मुलाखतीत रिंकू अध्यात्माकडे झालेल्या तिच्या प्रवासाबद्दल सविस्तरपणे बोलली. ” खरंतर आधी मी नास्तिक होते, पण केदारनाथला गेल्यावर, तिथे आलेल्या काही अनुभवांमुळे माझा थोडा विश्वास बसू लागला. मग मी उपवास वगैरे करायला लागले. पूजा करू लागले, मग मला त्याचे अनुभवही आले, ” असं रिंकूने सांगितलं.
” आता मी त्या गोष्टींकडे वळले. खरंतर पूजा पाठ, सण उत्सव यामागे काही वैज्ञानिक कारणंही आहेत. कुठलीतरी शक्ती आहे. जेव्हा इच्छाशक्ती प्रबळ असते, तेव्हा आपण त्या गोष्टींकडे वळतो. माझ्याबाबतही तसंच काहीसं घडलं. माझ्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडल्या, ज्यामुळे मी या गोष्टींवर विश्वास ठेवू लागले, मी या गोष्टी करायला लागले. मला असं वाटतं की आता इथेच ती आशा आणि शांतता आहे. सकाळी मी देव पूजा करते, जप करते, या गोष्टीतून मला आनंद मिळतो”, असं रिंकूने नमूद केलं.
केदारनाथमध्ये आला विलक्षण अनुभव
पुढे बोलता बोलता रिंकूने तिला केदारनाथमध्ये आलेल्या विलक्षण अनुभवाबद्दल सांगितलं. ” मला जो अनुभव आला, तो कधीही न विसरता येण्याजोगा आहे. एत दिवस मला अचानक वाटलं की केदारनाथला जावं आणि मी गेलेही. गुरूवार होता, पौर्णिमेच्या दिवशी मी चालत गेले, पण खूप थकलेसुद्धा होते. मी दर्शन घेतलं आणि तेव्हा मला वाटलं की जाताना तरी हेलिकॉप्टर मिळू दे. कारण पुढल्याच दिवशी फ्लाईट होतं. मी खूप दमले होते, रडलेही… तिथे एक मला माणूस म्हणाला होता की, हेलिकॉप्टर मिळेल. दोन तीन तास यासाठी आम्ही थांबलो. पण हेलिकॉप्टर काही आलं नाही. अंधार व्हायला आला होता. “असं रिंकूने सांगितलं.
मी देवाला म्हटलं…
हा अनुभव सांगताना रिंकू पुढे म्हणाली, “मी देवाला म्हटलं हेलिकॉप्टर येऊ दे, मी कुटुंबासह दर्शनाला येईन. त्यानंतर तिथे एक माणूस आला आणि म्हणाला आता हेलिकॉप्टर मिळणार नाही. ते ऐकून त्रास झाला, मी प्रचंड चिडले होते, त्याच त्राग्यात म्हटलं हा काय देव आहे ? एक हेलिकॉप्टर हवंय (मला) तर मिळत नाहीये, तशीच बडबड करत पुढे जात होते. तेवढ्यात माझ्या मागून एक माणूस आला आणि त्याने मला सांगितलं की हेलिकॉप्टरमध्ये 2 जागा आहेत. ते ऐकून मी आनंदात पळत पळत पुढे गेले, आणि पुढच्याच क्षणी धाडकन खाली पडले. तेव्हा माझ्या गुडघ्याला लागलं. त्यानंतर मी देवाला म्हटलं, यापुढे कधीच तक्रार करणार नाही. कारण त्याच क्षणी मला शिक्षा मिळाली होती ” असा विलक्षण किस्सा, अनुभव रिंकूने यावेळी शेअर केला
मला खूप त्रास झाला. मी चिडले. मी देवाला म्हटले की, हा काय देव आहे, हेलिकॉप्टर हवाय तर मिळत नाही, असं म्हणत पुढे गेले. एक व्यक्ती आला आणि म्हणाला, हेलिकॉप्टरमध्ये दोन सीट आहेत. मी आनंदात पळत गेले पण खाली पडले. माझ्या गुडघ्याला लागलं. मी देवाला म्हटलं, पुढे कधीच तक्रार करणार नाही. कारण मला त्याच क्षणी मला शिक्षा मिळाली होती”, हा किस्सा तिनं मुलाखतीतून शेअर केला. ” हे कसं घडलं माहीत नाही, कारण तेव्हा बरेच लोक वाट पहात होते, पण फक्त आम्ही दोघीच हेलिकॉप्टरमधून गेलो. त्यानंतर माझा विसवास बसला की अशी काही एक शक्ति आहे”, असंही रिंकूने नमूद केलं.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



