RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

RCB vs CSK All Scenario of Rain : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याबाबत देशभरात उत्सुकता आहे. हा सामना आयपीएल 2024 मधील आतापर्यंतचा सर्वात हाय-व्होल्टेज सामना असू शकतो, जो 18 मे रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियम सजले आहे, कारण हा सामना क्वालिफायर संघाचा निर्णय घेणार आहे. मात्र सामन्यापूर्वी हवामान खात्याने चाहत्यांचे टेन्शन वाढवले ​​आहे. या सामन्यात पावसाची दाट शक्यता आहे.

पाऊस पडला तर काय समीकरण होईल?

पावसामुळे सामना रद्द झाला तर चेन्नई सुपर किंग्ज पात्र ठरेल. पण तुम्हाला माहिती आहे का की जर पावसामुळे मॅचची ओव्हर्स कमी झाली तर आरसीबी जिंकण्यासाठी किती रन्स टार्गेट करेल. सामना 20 षटकांचा असेल, तर चेन्नईकडून नेट रट नेट सुधारण्यासाठी आरसीबीला 18.1 षटकांत 180 धावांचे लक्ष्य गाठावे लागेल किंवा 180 धावांच्या लक्ष्यात 18 धावांनी विजय मिळवावा लागेल.

दुसरीकडे, पावसामुळे षटके कमी झाली, म्हणजे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर आरसीबीचे गणित काय असेल? समजून घ्या...

RCB Vs CSK : पावसामुळे सामना रद्द कोणाचा खेळ होणार खल्लास? चेन्नई-बंगळूरमध्ये प्ले-ऑफसाठी झुंज, जाणून घ्या गणित

षटके कमी झाली तर आरसीबीसाठी काय असेल समीकरण?

जर सामना 15-15 षटकांचा झाला तर.... आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 170 धावा केल्या तर त्यांना सीएसकेला 152 धावांवर रोखावे लागेल. जर सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना 170 धावा केल्या तर आरसीबीला 13.1 षटकात 171 धावा करून हे लक्ष्य गाठावे लागेल.

जर 10-10 षटकांचा सामना झाला तर..... आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 100 धावा केल्या तर त्यांना सीएसकेला 82 धावांवर रोखावे लागेल. जर सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना 100 धावा केल्या तर आरसीबीला 8.1 षटकात 101 धावा करून हे लक्ष्य गाठावे लागेल.

जर सामना 5-5 षटकांचा झाला तर..... आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 50 धावा केल्या तर त्यांना सीएसकेला 32 धावांवर रोखावे लागेल. जर सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना 50 धावा केल्या तर आरसीबीला 3.1 षटकात 51 धावा करून हे लक्ष्य गाठावे लागेल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply