Ratnagiri News : रत्नागिरीत बैलगाडा शर्यतीला गालबोट, बैलाच्या धडकेत चिमुकल्यासह वडील गंभीर जखमी

Ratnagiri Bailgada Sharyat : रत्नागिरीच्या चिपळूनमध्ये बैलगाडा शर्यतीला गालबोट लागल्याची घटना समोर आली आहे. या स्पर्धेदरम्यान बैलाच्या धडकेत  एका चिमुकल्यासह वडील गंभीर जखमी झाले आहेत. सध्या या चिमुकल्यासह वडिलांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूनच्या कळमुंडी येथे रविवारी 14 तारखेला बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. ही शर्यत पार पडल्यानंतर जिंकलेल्या बैलासोबत फोटो काढायला जाणं पिता-पुत्रांना चांगलेच महागात पडलं. फोटो काढत असताना अचानक बैलाने या पिता-पुत्रांना शिंग मारले. बैलाच्या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले.

बैलाने शिंग मारल्यामुळे चिमुकल्याचा जबडा आणि कान फाटला. जखमी मुलावर कराडमधील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. तर त्याच्या वडिलांवर देखील उपचार सुरु आहेत. जखमी झालेले पिता-पुत्र हे चिपळूनच्या कोंढे गावातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणी एकच खळबळ उडाली होती.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने गुरुवारी बैलगाडा शर्यतीबाबत मोठा निर्णय दिला. सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली. कोर्टाने महाराष्ट्र सरकारने बैलगाडा शर्यतीसंदर्भात तयार केलेला कायदा वैध असल्याचे ठरवत या शर्यतीला परवानगी दिली. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्यभरात आनंदाचे वातावरण आहे. कोर्टाच्या या निर्णयाचे स्वागत सगळ्यांकडून करण्यात येत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply