Raju Shetti : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर 'स्वाभिमानी'ने रोखली ऊस वाहतूक कारखाना समर्थक-कार्यकर्त्यांत झटापट, बाचाबाची

Raju Shetti : कर्नाटकातून दानवाड आणि घोसरवाड (ता.शिरोळ) येथे आलेले उसाचे ट्रॅक्टर  आणि ट्रॉली स्वाभिमानी शेतकरी संघटना व आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरले. यावेळी कारखानदार समर्थक आणि कार्यकर्त्यांच्यात झटापट व बाचाबाची झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले.

पोलिसांनी  घटनास्थळी धाव घेऊन हे ट्रॅक्टर कारखान्याकडे रवाना केले. मागील हंगामातील चारशे रुपये व पुढील हंगामातील दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू नयेत आणि शेतकऱ्यांनी ऊस तोड घेऊ नये, असे आवाहन संघटनांनी केले आहे. मात्र कारखाने सुरू झाले असून कारखानदारांनी कर्नाटकातून ऊस आणण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी पोलिसांचा बंदोबस्तही घेतला आहे.

Nashik Cirme News : माजी मंत्री पुष्पाताई हिरे, प्रशांत हिरे यांच्यासह 22 शिक्षकांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण

काल दानवड आणि टाकळीवाडी येथे संघर्ष सुरू झाला. निर्णय झाल्याशिवाय ऊसतोड करू नये, असा दोन्ही संघटनांनी इशारा दिला आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांची आक्रोश पदयात्रा काल (शुक्रवार) इस्लामपूर येथून सुरू झाली असतानाच शिरोळ तालुक्यातील कारखान्यांनी कर्नाटकातील ऊसतोडी सुरू करून सात ट्रॅक्टर व ट्रकमधून दानवाडमार्गे ऊस महाराष्ट्रात आणला.

महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर असणाऱ्या दूधगंगा नदीच्या पुलावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टर आणि ट्रकच्या आडवे झोपत रोखून धरले. काही वेळातच त्या ठिकाणी कारखाना समर्थकांनी मोठी गर्दी केली. कार्यकर्ते आणि समर्थकांच्यात जोरदार वादावादी झाली. तब्बल दोन तासांहून अधिक काळ हा प्रकार सुरू होता. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते.पोलिसांनी हस्तक्षेप करत आडवे झोपलेल्या कार्यकर्त्यांना बाजूला करत वाहने कारखान्याच्या दिशेने रवाना केली.

कर्नाटक राज्यातील सदलगा येथून घोसरवाड-दत्तवाडमार्गे उसाचे ट्रॅक्टर येत असल्याची माहिती संघटना व आंदोलनाच्या कार्यकर्त्यांना मिळताच टाकळीवाडी हद्दीत हे ट्रॅक्टर अडवून टायर फोडून रोखून धरले होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांना शांत केले. रात्री उशिरा कारखाना समर्थकांनी ट्रॅक्टर दुरुस्त करून कारखान्याकडे घेऊन गेले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply