
Nashik Cirme News : नाशिकमधील राजकारणातून मोठी बातमी आली आहे. शिक्षकांची नियमबाह्य नियुक्ती करुन शासनाची फसवणूक केल्या प्रकरणात तब्बल 106 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील महात्मा गांधी विद्या मंदिर संस्था आणि आदिवासी सेवा समिती संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक व कर्मचाऱ्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षणाधिकरींनी या नियुक्तीला नियमबाह्यपणे मान्यता दिली. त्यामुळे शासनाला वेतनापोटी लाखो रुपये द्यावे लागल्याचा आरोप आहे. या प्रकरणात या संस्थांचा तत्कालीन संचालक तथा माजी आरोग्यमंत्री पुष्पाताई हिरे, माजी मंत्री प्रशांत हिरे त्यांची चिंरजीव डॉ.अपूर्व हिरे, अद्वय हिरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण 106 जणांवर गुन्हा दाखल असून त्यात 22 शिक्षक आहेत. नाशिकचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी ही माहिती दिली.
काय आहे हा प्रकार
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्था आणि आदिवासी सेवा समिती या संस्थांमध्ये कर्मचारी भरतीसाठी चुकीच्या महितीच्या आधारे प्रस्ताव तयार केले गेले. या प्रस्तावांना शिक्षणाधिकारी यांनी मंजुरी दिली. शिक्षण उपनिरीक्षक डॉ. किरण कुंवर यांनी तक्रार दिल्यानंतर 106 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात संस्था चालक आणि प्राचार्य यांचाही समावेश आहे.
|
|
हिरे कुटुंबियांवर गुन्हा दाखल
शासनाच्या फसवणूक प्रकरणात तत्कालीन व विद्यमान संचालक मंडळाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री पुष्पाताई हिरे, उपाध्यक्ष पंडित दगा नेरे, कोषाध्यक्ष स्मिता प्रशांत हिरे, सचिव प्रशांत हिरे, सहसचिव दीपक सूर्यवंशी, सभासद डॉ. अपूर्व प्रशांत हिरे, अद्वय प्रशांत हिरे यांचा समावेश आहे. शिक्षण विभागाने केलेल्या चौकशीत ही बाब समोर आली आहे. या प्रकरणात दोन गुन्हे दाखल आहे. पहिला गुन्हा 7 शिक्षक आणि 1 लिपिक, दुसऱ्या गुन्ह्यात 22 शिक्षक 10 लिपिक यांच्यावर आहे.
पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले होते आदेश
हिरे कुटुंबियांच्या असलेल्या या दोन्ही संस्थांमधील भरतीसंदर्भात तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. अद्वय हिरे यांनी जानेवारी महिन्यात ठाकरे गटात प्रवेश केला होता. दादा भुसे यांनी ठक्कर देण्यासाठी ठाकरे गटाने त्यांना शिवसेनेत घेतले होते.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!




























Subscribe to my channel




