Raju Shetti : मोठी बातमी! राजू शेट्टींचा मतदारसंघ ठरला, स्वाभिमानी लढविणार लाेकसभेच्या सहा जागा

Raju Shetti : देशभरात लोकसभेच्या निवडणुकांची तयारी सर्व राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. या मध्ये महाराष्ट्रात देखील मविआने लोकसभेसाठी कंबर कसली आहे. यासोबतच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील आता तयारी चालू केली आहे.

आगामी काळात होणाऱ्या लोकसभेच्या सहा जागांवर स्वाभिमानी शेतकरी संघटना निवडणुक लढवणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे. दरम्यान सर्वांची ईडी चौकशी करा. माझ्या चौकशीचा विचार असेल तर त्यासाठी देखील मी तयार आहे असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नमूद केले. तर लोकसभेत आम्ही कोणत्याही पक्षासोबत युती करणार नाही असेही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.

सांगली येथे पत्रकारांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले,"राज्यात सहकार व अनेक क्षेत्रात मोठा भ्रष्टाचार सुरु आहे. ED चौकशी करायची असेल तर या सर्वांचीच करा, फक्त विरोधक आहेत म्हणून चौकशी करू नका" असा टोला त्यांनी भाजप सरकाराला लगावला. यामध्ये माझा सुद्धा चौकशी करायची असेल तरी खुशाल करा. मात्र भाजपामध्ये येण्यासाठी दबाव तंत्र वापरू नका असा टोलाही राजू शेट्टी यांनी भापजला लगावला.

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये स्वाभिमानी पक्ष कोणत्याही पक्षासमवेत युती करणार नाही. स्वाभिमानी पक्ष हा राज्यभरात सहा ठिकाणी लोकसभा निवडणूक लढणार आहे. यामध्ये मी स्वतः हातकणंगले मतदारसंघातून लढेन असेही राजू शेट्टीयांनी स्पष्ट केले.

दरम्यान लोकसभेसाठी अनेक राज्याबाहेरील राजकीय पक्षाचं लक्ष महाराष्ट्रावर आहे. राज्यात एकून ४८ लोकसभेच्या जागा आहेत. या जागांवर शिवसेना आणि भाजपचे खासदार आहेत. मात्र २०२४मध्ये राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply