लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी सभागृहात भाषण केलं. सभागृहात बोलताना राहुल गांधी यांनी अमेरिकेवर निशाणा साधलाच पण केंद्रातल्या मोदी सरकारवरही हल्लाबोल केला. “अमेरिकेच्या दबावाखाली केंद्र सरकारने ट्रेड डील केलीय. भारताने त्यांचं ऐकलं नाही तर ते पुन्हा टॅरिफ वाढवतील. अमेरिकेची नजर भारताच्या डेटावर आहे” असं राहुल गांधी म्हणाले. “मी इकोनॉमिक सर्वे पाहत होतो. मला त्यात दोन गोष्टी दिसल्या. पहिली गोष्ट म्हणजे आपण अशा जगात राहतोय त्यात जियोपॉलिटिकल संघर्ष वाढतोय. अमेरिकेच्या दबदब्याला चीन, रशिया आणि दुसऱ्या शक्ती आव्हान देत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आपण एनर्जी आणि फायनान्शिअल शस्त्रांच्या दुनियेत वावरतोय. आपण स्थिरतेच्या विश्वातून अस्थिरतेच्या जगात चाललो आहोत” असं राहुल गांधी म्हणाले.
“प्रत्यक्षात आपण युद्धाच्या काळात जगतोय. तुम्ही पाहू शकता युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. गाजामध्ये युद्ध आहे. मिडिल ईस्टमध्ये युद्ध आहे. इराणमध्ये युद्धाचा धोका आहे. आपण ऑपरेशन सिंदूर केलं. आपण अस्थिरतेच्या विश्वात जगतोय. डॉलरला आव्हान दिलं जातय. माझे मित्र समजतायत, मुख्य खेळ हा आहे की डॉलरला आव्हान दिलं जातय. US च्या दबदब्याला आव्हान दिलं जातय. आपण सुपरपावरच्या विश्वाकडून कुठल्या नव्या देशाकडे जातोय. त्याचा आपण अंदाज लावू शकत नाही” असं राहुल गांधी म्हणाले.
पॉपुलेशन एक संपत्ती असू शकते
“US आणि चीनच्या स्पर्धेत सर्वात महागडी गोष्ट भारतीय डेटा आहे. अमेरिकेला सुपरपावर म्हणून टिकून रहायचय. अमेरिकेला आपले डॉलर वाचवायचे आहेत. त्यांच्यासाठी भारतीय डेटा महत्वाचा आहे” असं राहुल गांधी म्हणाले. “मला आठवतय बरेचसे लोक बोलायचे की, लोकसंख्या एक ओझं आहे, लोकसंख्या डिजास्टर आहे. पण पॉपुलेशन एक संपत्ती असू शकते. ही एक ताकद आहे. पण तुम्ही त्याचा डेटा ओळखता, तेव्हाच ती ताकद आहे” असं राहुल गांधी म्हणाले.
आम्ही तुमचे नोकर आहोत असे तुम्ही बोलू नका
“जर इंडिया अलायन्सची प्रेसिडेंट ट्रम्प यांच्यासोबत चर्चा सुरु असती, तर मी तुम्हाला सांगतो, आम्ही पहिलं काय केलं असतं, सर्वात पहिलं आम्ही प्रेसिडेंट ट्रम्पला बोललो असतो, या इक्वेशनमध्ये सर्वात जास्त महत्वाचा आहे इंडियन डेटा. तु्म्हाला तुमचा डॉलर वाचवायचा असेल, तर आम्ही तुमचे मित्र आहोत. आम्ही तुम्हाला तुमचा डॉलर वाचवायला मदत करु शकतो. तुमच्या डॉलरला वाचवू शकते अशी गोष्ट इंडियन लोकांकडे आहे. जर, तुम्हाला या डेटाचा एक्सेस हवा असेल, तर चर्चा समान पातळीवर झाली पाहिजे. आम्ही तुमचे नोकर आहोत असे तुम्ही बोलू नका” असं राहुल गांधी म्हणाले.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


