
Puppies Burn Alive : माणूस हा इतर सर्व प्राण्यांपेक्षा सर्वाधिक क्रूर आहे. हे दर्शविणाऱ्या अनेक घटना आपल्यासमोर घडत असतात. क्रूरतेचा कळस गाठणारी घटना उत्तर प्रदेशच्या मेरठ येथे घडली आहे. रात्री भटके कुत्रे भुंकतात आणि त्यामुळे झोप मोड होते, या कारणास्तव दोन महिलांनी कुत्र्याच्या पाच पिलांना जिवंत जाळलं. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार शोभा आणि आरती नावाच्या दोन महिला कुत्र्याच्या भुंकण्यामुळं त्रस्त होत्या. रात्री झोप मोड होते, म्हणून दोघींनी पिलांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळलं. मेरठच्या कंकरखेडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटना ५ नोव्हेंबर रोजी घडली असल्याची महिती तक्रारदार अंशुमली वशिष्ठ यांनी दिली. वशिष्ठ या ॲनिमल केअर सोसायटीच्या सरचिटणीस आहेत. दोन महिलांनी माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केल्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी त्यांना हटकलं. पण या महिलांनी त्या लोकांवरच धावून जाण्याचा प्रयत्न केला. मग स्थानिकांनी पोलिसांना फोन करून बोलावून घेतलं, तोपर्यंत महिलांनी घटनास्थळावरून पळ काढला होता. स्थानिक रहिवाशांनी मिळून मग जळालेल्या कुत्र्याच्या पिलांचे मृतदेह पुरले.
घटना घडूनही पोलिसांनी काहीच केले नाही. त्यानंतर अंशुमली वशिष्ठ यांनी काही स्थानिक मान्यवर मंडळींना घेऊन कंकरखेडा पोलीस ठाणे गाठले आणि आरोपी महिलांविरोधात तक्रार दाखल केली.
|
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित |
जन्म होऊन तीनच दिवस झाले होते
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या पिलांचा मरण्याच्या तीन दिवसांआधी जन्म झाला होता. या पिलांनी अद्याप डोळेही व्यवस्थित उघडले नव्हते. मात्र आरोपी महिलांनी अतिशय निर्घृणपणे पाचही पिलांवर पेट्रोल टाकून त्यांना जाळून टाकले. स्थानिकांनी या दोन्ही महिलांना सदर कृत्य केल्यानंतर जाब विचारला होता. पण त्यांनी दाद दिली नाही, तसेच पोलिसांना जेव्हा याप्रकरणाची माहिती दिली, तेव्हा त्यांनीही गंभीरपणे चौकीशी केली नाही, अशी माहिती वशिष्ठ यांनी दिली.
कंकरखेडा पोलीस ठाण्याचे प्रमुख अधिकारी जितेंद्र कुमार यांनी सांगितले की, आगळीक करून प्राण्यांचा खून करण्याच्या गुन्ह्यासाठी दोन्ही महिलांच्या विरोधात “प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध, कायद्या”च्या कलम ३२५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. आता पुढील तपास करून कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वशिष्ठ यांनी सांगितले की, हे पाचही पिले भटक्या कुत्र्यांची होती.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
























Subscribe to my channel




