Pune Weather Update : पुणे कमाल तापले; कोरेगाव पार्क ४३.३, तळेगाव ढमढेरे ४३.४ अंशांवर

Pune Weather Update :  पुण्यातील शिवाजीनगर येथे यंदाच्या उन्हाळ्यात कमाल तापमानाचा रविवारी उच्चांक झाला. शहरात ४१.३ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. तळेगाव ढमढेरे येथे ४३.४ आणि कोरेगाव पार्क येथे ४३.३ कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवसांमध्ये कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल, असा अंदाजही हवामान खात्यातर्फे शनिवारी वर्तविण्यात आला.

शहरात सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाचा चटका लागत होता. दुपारी ११ वाजल्यानंतर उन्हाच्या चटक्याची तीव्रता वाढली. दुपारी चारपर्यंत उन्हाचा भयंकर चटका जाणवत होता. रविवार सुटीच्या दिवशी रस्त्यावर वाहतूक कमी होती.

Pune Crime News : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या छाप्यात शिंदवणेत दाेघांना अटक, 2 लाखाचा मुद्देमाल जप्त

पण, इतर रविवारी जाणवणारी तुरळक गर्दीची दुपारी १२ ते तीन या वेळेत जाणवत नव्हती. कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांनी टोपी, गॉगल घातला होता. पूर्ण चेहरा झाकून घेऊन दुचाकीवरून प्रवास करणारे प्रवासी दिसत होते.

रस्त्यावर ठिकठिकाणी शीतपेये विक्रेत्यांच्या दुकानावर नागरिकांनी गर्दी केल्याचेही चित्र शहरात रविवारी दिसले. पुणे शहरात यंदाच्या उन्हाळ्यात गुरुवारी (ता. १८) आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे ४१ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले होते.

अवघ्या दहा दिवसांमध्ये ढगाळ वातावरण आणि पाऊस पडल्याने कमाल तापमान शनिवारपर्यंत (ता. २०) ३७.८ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाले होते. त्यानंतर पुन्हा कमाल तापमानाचा पारा वाढून आता ४० अंश सेल्सिअसच्या वर उसळी मारली आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील कमाल तापमान चाळिशी पार जाण्याचा आजचा पाचवा दिवस ठरला.

शहरात गेल्या वर्षी फक्त एक दिवस कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस नोंदले गेले होते. त्यापूर्वी म्हणजे २०२२ मध्ये सात दिवस कमाल तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडली होती. त्या वर्षी २८ एप्रिलला ४१.८ अंश सेल्सिअस इतके उच्चांकी कमाल तापमान नोंदले होते. त्यानंतर बरोबर दोन वर्षांमधला रविवारी दुसरा उच्चांक नोंदला गेला.

उन्हाचा चटका वाढणार

पुणे शहरात पुढील दोन दिवसांमध्ये सोमवारी (ता. २९) कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस नोंदले जाईल. तर, त्यानंतर एप्रिलच्या शेवटी मंगळवारी (ता. ३०) आणि मेच्या सुरुवातीला बुधवारी (ता. १) ४२ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढेल. त्यानंतर दोन ते चार मे या दरम्यान आकाश निरभ्र राहण्याची शक्यता असल्याने कमाल तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांनो या आठवड्यात उन्हाच्या वेळा सोडून घराबाहेर पडा.

असा वाढला कमाल तापमानाचा पारा (अंश सेल्सिअसमध्ये)
२४ एप्रिल ............ ३८.५
२५ ......................... २९.४
२६ ......................... ४०.३
२७ ......................... ३०.९
२८ ......................... ३१.३



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply